४ भारतीयांसह २२ प्रवाशांना नेपाळला घेऊन जाणारे विमान बेपत्ता
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
30 May 2022, 8:58 AM
नवी दिल्ली : नेपाळच्या खासगी विमान कंपनी तारा एअरचे विमान रविवारी बेपत्ता झाले. या विमानाचा वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आहे. एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्स येत आहेत. तारा एअरच्या या छोट्या प्रवासी विमानात एकूण 22 प्रवासी असल्याची माहिती आहे, त्यापैकी चार भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेले तारा एअर 9 NAET हे विमान पोखराहून जोमसोमला जात असताना वाटेत नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला.
विमानाने पोखराहून जोमसोमला सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते, पण मुस्तांग परिसरातपोहोचल्यानंतर संपर्क तुटला.
वृत्तसंस्थेनुसार, नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फणींद्र मणि पोखरल यांनी सांगितले की, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाने तातडीने दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोध मोहिमेसाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. मुस्तांग येथील जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी राम कुमार दाणी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
Post Views: 332