अकोला नाथ शक्तिपीठाचा नारदीय - वारकरी कीर्तन महोत्सव


नाथांच्या छत्रछायेत पर्वणी आत्मोन्नतीची
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Nov 2026, 12:43 PM
   

अध्यात्मयोग महर्षि नाथशक्तिपीठाधीश प.पू. सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराज, वेदमंत्रांचे अतुल्य सामर्थ्य आणि नाथपंथाच्या अखंड गुरुपरंपरेच्या सिद्धतेचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. त्यांनी वयाच्या नव्वदीत पदार्पण केले आहे. या निमित्ताने अकोला नाथशक्तिपीठ परिवार न्यू तापडिया नगर, अकोलाच्या वतीने २०२६-२७ हे वर्ष 'नाथांच्या छत्रछायेत पर्वणी आत्मोन्नतीची' म्हणून साजरे करणार आहेत. या आयोजनाचे प्रमुख ४ पर्व असतील.नाथपंथाचा प्रसार प्रचारार्थ आयोजित पहिले पर्व अर्थात भव्य नारदीय-वारकरी कीर्तन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून अकोल्याचे पालकमंत्री अॅड. आकाशदादा फुंडकर यांची उपस्थिती राहील. तर, खासदार श्री. अनुपजी धोत्रे, आ. रणधीरजी सावरकर, आ. साजिदखानजी पठाण, आ. वसंतजी खंडेलवाल, आ. नितीनजी देशमुख, आ. हरीशजी पिंपळे, आ. प्रकाशजी भारसाकळे, महापौर सौ. शारदाजी खेडकर, सभापती श्री. विजयजी अग्रवाल, जिल्हाधिकारी वर्षाजी मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. अर्चितजी चांडक, मनपा आयुक्त श्री. सुनीलजी लहाने, स्वागताध्यक्ष माजी न्यायमूर्ती श्री. बाळासाहेब मेहरे या मान्यवरांची उपस्थिती राहील. दि. २० ते २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अकोल्याच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृहात होणाऱ्या या भव्य नारदीय - वारकरी कीर्तन सोहळ्यातील पहिले पुष्प नारदीय कीर्तनकार, सहा पिढ्यांपासून कीर्तन परंपरेचा वारसा असणारे, पुण्याचे ह.भ.प. डॉ. अजय अपामार्जने, दुसरे नारदीय कीर्तनपुष्प ठाण्याच्या ह.भ.प. सुरमणी श्रीमती मंजुषा भाभे, तिसरे वारकरी कीर्तनपुष्प श्रीविठोबा दादा विशुद्ध वारकरी शिक्षण संस्था पुणे येथील ह.भ.प. श्री पराग महाराज चातुर्मास्ये, चवथे वारकरी कीर्तनपुष्प स्वानंदसुखनिवासी श्रीजोग महाराज वारकरी संस्था देवाची आळंदीचे सचिव ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज मुळीक, पाचवे नारदीय कीर्तनपुष्प माजलगाव येथील स्वामी गोविंदगिरी देव महाराजांचे शिष्य ह.भ.प. श्री. लक्ष्मीप्रसाद पटवारी, तर अंतिम नारदीय कीर्तनपुष्प चिपळूणचे ह.भ.प. श्री. महेशबुवा काणे गुंफतील. 'कलियुगात नाथपंथाचे माहात्म्य' या विषयावर सर्व मान्यवर कीर्तनकार आपले विचार मांडणार आहेत. त्यांना श्री. मनोज जहागीरदार, श्री. मिलिंद सभापतीकर तबल्यावर, श्री. गजानन रत्नपारखी, श्री. संदीप काळे हार्मोनियमवर, तसेच दुर्गवाडा येथील मृदंगाचार्य, गायनाचार्य तसेच टाळकरी मंडळी साथ करतील. या कीर्तनसोहळ्याचा लाभ जिल्ह्यातील धर्मप्रेमी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व