नितीन बोंडफळे यांच्या गायवासराचा बिबट्याने पाडला फडशा
निंबा गावात वन्यप्राण्यांचा हैदोस
अकोला-- बाळापूर तालूक्यातील निंबा येथे वन्यप्राण्यांचे गावांमध्ये संचार झाल्यामुळे गावकरी भयभित झाले असून परवा एका गायीच्या वासराची बिबट्याने शिकार करून फडशा पाडला.श्री नितीन रामभाऊ बोंडफळे यांच्या गायीचे हे १ वर्ष वयाचे वासरू होते.
गावा शेजारील वनविभागातून हे प्राणी आजकाल गावात शिरतात,आणि छोट्या जनावरांना तावडीत पकडून आपल्या भक्षाची व्यवस्था करतात.गतप्राण झालेल्या वासराबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.परंतू गावकरी आणि वन विभागाने नेहमीच सतर्क राहणे आवश्यक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Post Views: 536