बुलढाणा. सिंदखेड राजा तालुक्यात,समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!
दुसरबीड जवळ ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली; ट्रकच्या धडकेने वाहनांची साखळी दुर्घटना; अनेक वाहनांचे मो
सुदैवाने जीवित हानी नाही...
बुलढाणा : समुद्धी महामार्गावर दुसरखेडजवळ भीषण अपघाताची घटना घडली. एका ट्रकने पुढील मोव्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने मागून येणारी भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. या साखळी अपघातात तब्बल १६ ते १९ वाहने एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून काही वाहने एकमेकांवर उलटल्याचे छायाचित्रांवरून दिसून येत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला असून नियंत्रित करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले घटनेची माहिती मिळताच मदतकार्य आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू झाले. अपघातात पंधरा ते वीस च्या वर लोक जखमी झाले असून अतिशय गंभीर अवस्थेत असणाऱ्या जखमींना जालना येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना स्थानिक दुसरबीड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादचे पालन आणि वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे !
Post Views: 197