पालघर:- बोईसर तारापूर - Midc कोलवडे नाका येथे mseb चा सडलेला लोखंडी पोल कामासाठी बाहेर पडलेल्या श्री . योगेश कांतीलाल पागधरे, रा.नवापूर यांच्या अंगावर पडून ते जबर जखमी झाले असल्याचे समजते. तसेच जखमी असलेल्या व्यक्तीला तातडीने तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.....
बोईसर तारापूर MIDC मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण? सर्व सामान्यांच्या जिविताशी का खेळ चालू आहेत? काही जनतेमधील जागरूक नागरीक भविष्यात होणार असलेल्या दुर्घटनेबाबत शासन, प्रशासन किंवा स्थानिक पोलीस ठाणे यांस माहिती देऊनही याची दखल का घेतली जात नाही? जखमी झालेल्या व्यक्तीची चूक काय? जर प्रत्येक शासकिय, निमशासकीय कार्यालयांनी आप आपली जबाबदारी आणि काम वेळेतच केले तर अशा दुर्घटना घडणार नाही. जखमी व्यक्तीचा जीव गेला तर MSEB चे स्थानिक AE , JE आणि त्या भागातील लाईनमन यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून नैसर्गिक मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होणार का? कारण अधिकारी वर्गाची चूक असताना, आपले काम व्यवस्थित रीत्या केले नसले कारणामुळे या दुर्घटना घडत आहेत. अशा वेळ काढू आणि खुर्ची उबविनाऱ्या अधिकारी वर्गावर कारवाई झालीच पाहिजे असे जनतेतून बोलले जात आहे. कारण कोविडमध्ये स्थानिकांच्या नोकऱ्या गेल्या, कुटूंबे रस्त्यांवर आली त्यावेळेस MSEB अधिकारी यांना जनतेची वीज खंडित करताना किंवा मीटर काढून नेताना दया आली का हो!!! त्यावेळेस नागरिकांनी विरोध केला त्या काळात पोलीस यांना हाताशी धरून आणि स्वताहाला असलेल्या अधिकाराचा वापर करून गुन्हे दाखल केले मग अशा अधिकारी वर्गाला पाठिशी का घालायचे? असे सर्व सामान्यांकडून बोलले जात आहे.. काही ठिकाणी तर पोलच चोरीला गेले आहेत त्याची तक्रार करूनही चौकशी करायची सोडून ग्राहकाला बिल पाठऊन वसूली करण्यात येत आहे. असे बरेचशे विषय आहेत...
या अधिकारी यांना जनतेनी विचारणा करायची नाही जर का विचारणा केली तर विचारणाऱ्याला दम दाटी करत गुन्हा दाखल करेन अशी भिती निर्माण करण्याचे असे बरेच विषय आहेत. या अधिकारी वर्गावर कारवाई होऊन दुर्गटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा वैद्यकीय खर्च MSEB करुन त्याला व त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार का? असे जनतेतून बोलले जात आहे. तसेच एमआयडीसी चे अधिकारी श्री. लांजेवार या प्रकरणाकडे कशा प्रकारे लक्ष देऊन जखमीला न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
Post Views: 203