फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा
अकोला : फुले-शाहू- आंबेडकर शिक्षक संघटना व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे वतीने ७ नोव्हेंबर १९०० रोजीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिन' न्यू महसूल कॉलनीतील पंजाबराव वर अध्यक्ष असलेल्या मा जिजाऊ सार्वजनिक वाचनालयात सकाळी 11 वाजता उत्सहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळासाहेब खंडारे होते तर प्रमुख उपस्थीतीमध्ये प्रा. डॉ. विजय आठवले (अध्यक्ष सम्राट अशोक प्रतिष्ठान), प्रा. सुनील कांबळे, (महासचिव सम्राट अशोक प्रतिष्ठान) प्रमुख मारदर्शक म्हणून सुभाष भालेराव साहेब (उपशिक्षणाधिकारी माध्य.), प्राचार्य डॉ. संतोष पेठे सर, बबलू तायडे सर (आदर्श शिक्षक पुरस्कार) आत्माराम तेलगोटे (से.नि. तहसीलदार), लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष रमेश समुद्रे, वासुदेवराव चक्रनारायण, रामकुमार खंडारे गुरुजी, रामकुमाखंडारे गुरुजी, ज्ञानदेव खंडारे, सुभाष इंगळे साहेब, ग्रंथालय अधिकारी अजय सिरसाट, अधिकारी), रत्नाकर भुजाडे, किसन शेगोकार, मंगेश झिने मनुताई बदरखे, मनीषा भुजाडे, जयश्री झिने, विद्या अंभोरे, सुरेखा सोनोने, सुवर्णा ठाकरे आदींची उपस्थिती होती, परिसरातील 20 होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. सुनील कांबळे यांनी तर संचालन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांनी तर आभार खंडारे गुरुजी यांनी मानले.
Post Views: 1