विदर्भ वैभव मंदिराच्या वार्षिक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ सभासदांचा गौरव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
31 Oct 2026, 3:26 PM
मुंबई : विदर्भ वैभव मंदिर, मुंबई या सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा विदर्भाचे सुपुत्र व विदर्भ वैभव मंदिर मुंबई चे प्रमुख विश्वस्त मा ना श्री. प्रतापराव सरनाईक साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून.सोबत मुंबईचे नगरपाल श्री चंद्रशेखर बहाकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व राहणार आहे, संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोकराव बारब्दे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेणे, संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी दिशा निश्चित करणे आणि सभासदांशी संवाद साधणे, हा या वार्षिक सभेचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा रोख पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या जडणघडणीत आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सुमारे २० ज्येष्ठ सभासदांचा सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. विदर्भ वैभव मंदिराच्या सामाजिक कार्याला सातत्याने दिशा देणारे संस्थेचे सरचिटणीस श्री. गजाननराव नागे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विदर्भातील समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून संस्थेच्या विविध उपक्रमांना चालना मिळाली असून, संस्थेच्या विकासाच्या वाटचालीत त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे. अध्यक्ष श्री. अशोकराव बारब्दे तशेच संस्थेचे धुरंदर नेतृत्व सरचिटणीस श्री गजाननरावजी नागे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सभासद आणि हितचिंतक यांच्या सहकार्याने संस्थेचे सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठांच्या योगदानाचा सन्मान करणे, या माध्यमातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
विदर्भ वैभव मंदिर ही मुंबईतील विदर्भवासीयांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक व्यासपीठ असून, विदर्भाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकात्मता जपण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था कार्यरत आहे. आगामी काळातही समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, ज्येष्ठ सभासद, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विदर्भातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Post Views: 119