डोंगरकिन्हीचे शेतीनिष्ठ डॉ.हेमंत देशमुख \"वसंतराव नाईक कृषिभूषण\" पुरस्काराने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Jul 2026, 12:00 PM
अकोला - शेती मातीशी अतुट नाते जपत प्रायोगिक कृषी साधनेतून शेतकऱ्यांसाठी प्रेरणायी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या डोंगरकिन्ही येथील डॉ.हेमंत वसंतराव देशमुख यांना शासनाकडून "वसंतराव नाईक कृषिभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उल्लेखनिय यशाचे आलेख प्रस्थापित करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन म्हणून शासनाकडून दरवर्षी विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कर्मसाधनेचा सन्मान केला जातो.त्यामध्ये २०२३ या वर्षासाठी निवड होऊन त्यांना अमरावती विभागातून डॉ.हेमंत देशमुख यांची " वसंतराव नाईक कृषिभूषण" पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.त्यांना यापूर्वी दोन वेळा राज्यपालांचे पुरस्कार,केन्द्र शासनाकडून सन्मान व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बहूमान प्राप्त झालेले आहेत.त्यामुळे त्यांचे हे सन्मानपात्र उल्लेखनिय यश हा वाशिम जिल्हा आणि विदर्भाचा सुध्दा बहूमान आहे.
डॉ.हेमंत देशमुख हे राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक आणि कृषी क्षेत्रातील वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिध्द व्यक्तिमत्व असून त्यांनी डॉक्टर म्हणून अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रातूनही आपल्या सेवा समर्पित केलेल्या आहेत.रूग्णसेवेनंतर त्यांनी शेती क्षेत्रासाठी पूर्ण वेळ देणे सुरू केले.त्यामुळे त्यांच्यासोबतच मालेगाव तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्याच्या नव्या दिशा प्राप्त झालेल्या आहेत.आपल्या सेवाभावी वृत्तीने जनसामान्न्यात मिसळणारे आणि सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्याने सहकार्यासाठी सतत तत्पर असणारे व्यक्तिमत्व हा आपला परिचय त्यांनी सिध्द केला आहे.
डॉ.हेमंत देशमुख यांनी हा सन्मान,आपले कुटुंबीय,शेतकरी आणि समाजातील सहकाऱ्यांना समर्पित केला आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धावत जाऊन सर्वांना मदत आणि मार्गदर्शनासाठी सज्ज असणारे हे बहूचर्चित व्यक्तिमत्व आहे.शासन आणि केंद्र शासनानेही कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांच्या केलेल्या सन्मानाबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.