आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हितचिंतक व स्नेहीजनांनी दिल्यात शुभेच्छा


निःस्वार्थ सेवा आणि मदतीमुळे आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून येते - आमदार सौ. सुलभाताई खोडके
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Sep 2026, 8:22 AM
   

अखंडित स्नेहरूपी जिव्हाळा असाच कायम राहू द्यावा या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करीत आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंनी मानले स्नेहीजनांचे आभार
अमरावती - मानवी जीवनाचा खरा उद्देश काय, असे विचारले,तर बहुतेक जण आनंदी, सुखी आणि समाधानी जीवन जगणे, असेच उत्तर देतील., परंतु केवळ सुखप्राप्ती हीच सर्वांच्या जीवनाचा एकमेव हेतू आहे, असे म्हणणे चूक ठरेल. समाजामध्ये वावरत इतरांच्या सुख - दुःखाशी समरस होऊन भोवताली अभावग्रस्त असे संघर्षाचे जीवन जगत असलेल्या वंचित, उपेक्षित आणि शोषिताविषयी संवेदनशीलता अंगी रुजविणे महत्वाचे ठरते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात आनंदाचा शोध घेत असतो., मात्र तो शोध बाहेर नसून आपल्या आतच दडलेला असतो.निःस्वार्थ सेवा आणि मदतीमुळे आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून येते. आपल्या क्षमतांची ओळख करून देत एकसंध व उत्तम संघटन कार्यकर्त्यांचे कौशल्याचे जाळे विणून नागरी समस्यांचे निराकरण करीत अमरावती शहरात विकासाचा समतोल साधणाऱ्या आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके हे नाव आज प्रत्येक घराघरात व मनामनात पोहोचले आहे. स्थानिक पकड, त्यांची सदैव तत्परतेने सुलभ उपलब्धता व त्यांचा स्वभाव हे घटक निर्णायक ठरतं आहे.जनसामान्यांची सेवा करण्यासाठी असलेली तयारी, स्पष्ट भूमिका आणि परस्पर आदर व नागरिकांशी असलेला सुसंवाद या त्रिसूत्रीचा अवलंब करीत समाजकारण व राजकारणात अविरतपणे वाटचाल करणाऱ्या आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके यांचा दिनांक 18 सप्टेंबर रोजी कौटुंबीक वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी गाडगेनगर परिसर स्थित निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात सकाळपासूनच स्नेहीजन व हीतचिंतकांनी उपस्थित राहून आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांना शुभेच्छा दिल्यात. स्वक्षमतांची जाणीव व इतरांनी केलेल्या मदतीची कदर यामुळे आत्मसन्मान वाढतो. याची अनुभूती या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली.निरागस सहकार्यशीलता, दुसऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना, अमरावती शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दूर्दम्य आत्मविश्वास बाळगीत भरघोस विकास निधी उपलब्ध करून शहरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी अंगी असलेली तळमळ यामुळे अमरावतीसह संपूर्ण पंचक्रोशीत आज सौ. सुलभाताई खोडके यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नागरिक - महिला भगिनी व युवक - युवतींची असलेली बहुसंख्य उपस्थिती ही सौ. सुलभाताई खोडके यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याची जणू साक्ष देत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. यावेळी जनसामान्यांकडून करण्यात आलेल्या स्वागत, सत्कार व शुभेच्छांचा स्वीकार करीत आपल्या सर्वांचे लाभणारे अखंडित पाठबळ हे माझ्यासाठी सदैव ऊर्जादायी ठरतं आहे. याची यावेळी सुलभाताई खोडकेंनी प्रांजळपणे कबुली दिली. यासोबतच हा स्नेहपूर्ण जिव्हाळा असाच सदैव माझ्यासोबत असू द्यावा. या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. खरंच ' कृतज्ञता ' फार महत्वाची गोष्ट आहे. माणूस म्हणून आपल्या संवेदना जिवंत ठेवणारी! जीवनातील चांगल्या गोष्टींकडे प्रेमाने आणि नम्रतेने बघणे, त्याबद्दल मनापासून आभार मानणे व इतरांना मदत करण्यास प्रवृत्त होणे ही एक अखंड शृंखला व्हावी. इतरांच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहिल्याने मन प्रसन्न राहते. नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही. आदर वाढतो, नातेसंबंध रक्ताचे नसले तरीही माणुसकीचे असतातच की! सामाजिक प्रश्नांची तड लावून खऱ्या अर्थाने सर्वांनाच पुरोगामीत्वाकडे नेण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या आमदार - संजय खोडके व यश सुलभा संजय खोडके यांनी सर्व उपस्थितांचे प्रति आभार व्यक्त करीत जीवनातील चढ - उतारांमध्येही आपल्या अखंडित पाठबळ तसेच सर्वांच्या सहवास - संपर्क - सानिध्य व समन्वयातून आजपर्यंतचा हा जीवनप्रवास सुकर झाल्याचे सांगितले. 

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व