वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व च्या वतीने महापालिकेच्या बांधकाम विभाग उपायुक्त मॅडम यांना पि डी के व्ही कडून येणारा व उमरी, न्यू तापडिया नगर मधून खरप कडे जाणारा नाला हा ठिक ठिकाणी फुटलेला असल्याने दर वर्षी पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन उमरी, न्यू तापडिया नगर व खरप मधील शेकळो लोकांच्या घरामध्ये हे पुराचे पाणी जावून अतोनात नुकसान होते याचा प्रत्यत गेल्या 2 वर्षापासून महापालिका प्रशासनाला आलेला आहे व या 2 वर्षात या भागात कुठलेही पंचनामे झाले नसून या भागातील कुठल्याही पूरग्रस्त नागरिकाला शासनाकडून आर्थिक मदत देखील मिळालेली नाही, येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी न्यू तापडिया नगर ते खरप या नाल्याला आवर भिंत घालून नाला फुटून होणाऱ्या नुकसान व त्रासापासून येथील नागरिकांचे संरक्षण करून या भागातील समस्या लक्ष्यात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी वंचितचे महानगर अध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य शंकरराव इंगळे, महासचिव मनोहर बनसोड, माणिक शेळके, सुरेश कलोरे, पुरुषोत्तम वानखडे, संजय वानखडे उपस्थित होते.
Post Views: 190