कस्तुरी सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिर संपन्न... एकूण ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Sep 2026, 8:56 AM
अकोला -- शहरातील प्रथितयश सेवाभावी संस्था ' कस्तुरी' ने सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कस्तुरीच्या गायगाव मार्गावरील ' कस्तुरी' परिसरात सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान आयोजित या शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला..
या शिबिराचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. शांताराम बुटे यांनी केले.. कस्तुरीचे जेष्ठ स्नेही मा. श्री देवीकिसनजी भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर माजी आमदार वसंतराव खोटरे व जेष्ठ पत्रकार मा.श्री.सिद्धार्थ शर्मा व कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.ॲड.किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती होती...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. संजय ठाकरे यांनी केले.. कार्यकारिणी सदस्य श्री. संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.. या कार्यक्रमात कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कस्तुरीच्या वतीने शाल, श्रीफळ , वस्त्र व मानपत्र देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.. याप्रसंगी ह.भ.प.सौ.संगीता जोध यांनी मानपत्र वाचन केले.
शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना डॉ. हेडगेवार रक्तपेढीतर्फे रक्तदान प्रमाणपत्र व कस्तुरी या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र , देववस्त्र व वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक प्राचार्य डॉ. शांताराम बुटे यांनी.. रुग्णांसाठी रक्तही केवळ वैद्यकीय गरज नसून जीवनाची आशा आहे... एका अनोळखी व्यक्तीने केलेले रक्तदान रुग्णाला नवजीवन देऊ शकते... ' रक्तदान हेच जीवनदान' आणि ' रक्तदान हेच महादान' आहे या उदात्त भावनेतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे व रक्तदान ही चळवळ व्हावी असे आवाहन केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख व कार्यकारिणी सदस्य श्रीमती अनिता इधोळ यांचे नेतृत्वात डॉ.हेडगेवार रक्तपेढी चे व्यवस्थापक श्री.रमेश देशपांडे , डॉ.पांडे व चमू कस्तुरीचे सर्वश्री संजय गायकवाड , संजय ठाकरे , अमर शर्मा , संजय बुटोले , सतीश बिटोडकर, दामोदर नुपे,वसंतराव देशमुख, राजेश्वर पेठकर , सौ.मीरा देशपांडे , चेतना आनंदानी, ज्योती सुलताने , कमल राठोड यांनी परिश्रम घेतले... याप्रसंगी शहरातील विविध सेवाभावी संस्था
जेष्ठ नागरिक संघ , पेन्शनर्स असोसिएशन, राजेश्वर योगासन मंडळ, गुड मॉर्निंग क्लब, श्रीसंकल्प,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , कस्तुरीचे आजीवन सदस्य,स्नेही व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते...
कस्तुरीच्या सेवाकार्याने प्रभावित होऊन स्नेही मा. श्री. कमल पन्नालाल मिश्रा यांनी या समयी कस्तुरीचे आजीवन सभासदत्व स्वीकारले.. त्यांचा कस्तुरीचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले , माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी शाल , वृक्षरोप व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला...याप्रसंगी कस्तुरी परिसरात भेट दिलेले सर्व मान्यवर व रक्तदाते यांची भोजनव्यवस्था करण्यात आली होती. कस्तुरीचे स्नेही मा . सतिश बिटोडकर यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी स्व.सौ.स्मिता सतिश बिटोडकर यांच्या स्मरणार्थ ३०० वृक्षरोप वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
Post Views: 8