विदर्भातील पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करण्याचे जाहिर आवाहन.


 संजय देशमुख  2022-07-31
   

        आज दिनांक 28 रोजी शेतकरी बचाओ आंदोलनाचे कार्यकर्त्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मा. श्री गणेशराव पाटील; विभागीय अध्यक्ष यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली व त्यामध्ये विदर्भामध्ये सातत्याने १ महिन्यापासून सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती,पिकांचे गुरे व अनेक गावचे वस्त्या घरात पुराचे पाणी गेले व त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची शेती पिकासह खरडून वाहून गेली आहे. आज  तो बिकट अवस्थेतून जात आहे. या सर्वाना  महाराष्ट्रामध्ये सध्याचे स्थितीत शासन व प्रशासन असल्याचे कुठेही जाणवत नाही;अशा या कोंडीमध्ये महाराष्ट्रातील हे लाखो नागरिक सापडलेले आहेत त्या सर्वांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली नाही तर अनेक अन्नदाते शेतकरी हे आत्महत्या करतील अशी साधार भीती आहे.              अशी बिकट स्थिती लक्ष्यात घेता शेतकरी बचावो आंदोलनाचे घाटंजी जि. यवतमाळ येथील विरदंडे महाराज यांनी पूरग्रस्तांची स्थिती लक्षात घेता तातडीने आपल्या गाव परिसरातील नागरिकाकडून गहू ;तांदूळ; डाळ बिस्किट पुडे गोळा करून वर्धा नदीचे पुरात नुकसान झालेल्या पुरात  चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तहसिल चे शेतकऱ्यांना वाहनाने मदत पाठवली आहे.           पुरग्रस्तांना मदतीकरीता शेतकरी बचाओ आंदोलनाचे वतीने आजचे बैठकीत कृषिरत्न डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने  शेतकरी जागरण महाभिमान राबविण्यात तातडीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामाध्यमातून विदर्भातील नागरिकांना  आवाहन करण्यात येत आहे की;आपले घरातून;गावातून किमान एक किलो धान्य व दहा रुपये गोळा करावेत व ज्या ठिकाणी घरातील धान्य कपडे;साहित्य वाहून गेले; अशा पर्यंत ते पोहोचवण्यात यावे तसेच गरीब विद्यार्थ्यांना शाळेचा ड्रेस; पुस्तके आधी साहित्य पुरवावे;समर्थ प्राध्यापक; शिक्षक; अधिका री;कर्मचारी;आर्थिक दृष्ट्या संपन्न नागरीक; प्रतिष्ठाने उद्योगपती यांनी शेतकऱ्यांना दत्तक घ्यावे व त्यांना बियाणे खते व पेरणीसाठी मजुरीची आवश्यक रक्कम पुरवावी असे आवाहन अभियानाच्या वतीने विभागीय अध्यक्ष श्री.गणेशराव पाटील;माजी उप कुलगुरू;अमरावती विद्यापीठ; शेतकरी संयोजक भाई रजनीकांत;डॉ.धर्मेंद्र राजपूत;अकोला;राजकुमार दिघडे;मानौरा;रवी गावंडे;नेरपरसोपंत;श्री.विर दंडे महाराज; घाटंजी जिल्हा यवतमाळ;अशोकराव सोरटे हिंगणघाट;श्री.जी.डी.इंगोले गुरुजी मूर्तिजापूर;डॉ.यशवंत वानखडे;खामगाव आदी मान्यवरांनी हे आवाहन केलेले आहे.

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व