श्रीमती राधादेवी गोयनका विद्यामंदिर हायस्कूल अकोला येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : वृक्षदिंडी, गणवेश वाटप व मार्गदर्शन सोहळा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Aug 2026, 12:53 PM
अकोला - स्थानिक विद्यामंदिर हायस्कूल, सिव्हिल लाईन, अकोला येथे १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन पूर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात शाळेत वृक्षदिंडी, पर्यावरण जनजागृती, मोफत गणवेश वाटप आणि विद्यार्थी मार्गदर्शनाचा विशेष कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने करण्यात आली. वृक्षदिंडीला सुरुवात करण्यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एम. एस. माळी मॅडम यांनी कडुलिंबाचे शास्त्रीय नाव (Azadirachta indica - अझाडिरॅक्टा इंडिका) सांगून त्याचे औषधी उपयोग आणि पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. झाडांचे संवर्धन व पर्यावरण संतुलनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी परिसरातून उत्साहात वृक्षदिंडी काढली व वृक्षारोपण केले.
तिक्ष्णगत संस्थेतर्फे गणवेश वाटप : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिक्ष्णगत बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. मा. सुगत वाघमारे सर यांचे विशेष सहकार्य व शुभेच्छा विद्यार्थ्यांना लाभल्या . तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी चे जिल्हा समन्वयक मा. सचिन पाटील सर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तिक्ष्णगत संस्थेतर्फे वेळोवेळी शाळेत राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सर्व उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मान्यवरांची उपस्थिती:
या प्रसंगी सुचिता मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत 'आपले ध्येय कसे साध्य करावे' यावर मार्गदर्शन केले. हे ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन किती महत्त्वाचे असते, हे त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाला सपना मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एम एस माळी मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, सौ नागपुरे मॅडम , सौ डोंगरे मॅडम, श्री सातरोटे सर तसेचशिक्षकेतर कर्मचारी श्री अग्रवाल व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
Post Views: 1