दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या डॉ हर्षवर्धन मानकर यांचे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेत सादरीकरण
अकोला: दि.३१ मे २०२४ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य व श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोलाचे सहयोगी प्रा. डॉ.हर्षवर्धन मानकर यांची 24 मे ते 29 मे २०२४ दरम्यान बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संमेलना करिता निवड झाली होती . बँकॉक येथे डॉ. मानकर यांचे भारतीय शास्त्रीय संगीत व गझल गायन याचे विशेष सादरीकरण झाले . भारतीय संस्कृतिक परिषदेच्या वतीने बँकॉक येथील स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, भारतीय राजदूत कार्यालयातील पदाधिकारी व या सेंटरचे कलावंत या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतातील या सांस्कृतिक संबंध परिषदे करिता डॉ.मानकर यांची निवड झाल्याने या निमित्ताने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यांच्या या निवडी करिता दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे , सहसचिव डॉ.संजय तिडके , सदस्य अनामिका देशपांडे , विशाल भोजने , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एल.कुलट, संगीत विभाग प्रमुख डॉ.किशोर देशमुख, मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख डॉ.कुणाल इंगळे,या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ.मनीष गवई व टीम झेनिथ चे श्री.मिथिल कळंबे यांनी याप्रसंगी त्यांचे अभिनंदन केले आहे .
Post Views: 239