नागरिक व पोलिसांमधील संवाद अधिक गतिमान होणार
परभणी जिल्हा पोलीस दलातील सर्व ठाण्यांना कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक
युसूफ पठाण (साप्ताहिक विश्व प्रभात, परभणी)
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांशी थेट, सुलभ आणि पारदर्शक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभाग आणि प्रमुख शाखांना कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक व सिमकार्ड वाटप करण्यात आले आहेत.
अधिकारी बदलला तरी संपर्क क्रमांक तोच राहणार!
सामान्यतः पोलीस ठाण्यातील अधिकारी किंवा कर्मचारी बदलल्यानंतर अथवा त्यांची बदली झाल्यानंतर नागरिकांना संपर्कासाठी नवीन क्रमांक शोधावे लागत असत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कार्यालयाचा किंवा पोलीस ठाण्याचा हा शासकीय मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी तोच राहणार असून, अधिकारी बदलले तरी नागरिकांना विनासायास थेट संपर्क साधता येईल. हे सर्व क्रमांक २४ तास सदैव ऑन-ड्युटी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असणार आहेत.
तक्रारी व आपत्कालीन मदतीला मिळणार वेग
नागरिकांच्या तक्रारी निवारण, महत्त्वाची माहिती देणे, आपत्कालीन प्रसंग आणि इतर शासकीय कामकाजासाठी हे संपर्क क्रमांक अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करून संवाद अधिक गतिमान व सुलभ करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
परभणी जिल्हा पोलीस दल: महत्त्वाचे व सर्व संपर्क क्रमांक
पोलीस नियंत्रण कक्ष: 7745852222
ई-मेल: sp.parbhani@mahapolice.gov.in
प्रमुख कार्यालये व विशेष शाखा:
मा. पोलीस अधीक्षक, परभणी — 8956834900
मा. अपर पोलीस अधीक्षक, परभणी — 8956834901
पोलीस उप अधीक्षक, परभणी (मु.) — 8956834902
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) — 8956834903
जिल्हा विशेष शाखा — 8956834904
जिल्हा वाहतूक शाखा — 8956834905
भरोसा सेल, परभणी — 8956834906
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष — 8956834907
अर्ज शाखा — 8956834908
सायबर सेल, परभणी — 8956834909
डायल ११२ — 8956834910
कार्यालय अधीक्षक, पो.आ. कार्यालय — 8956834936
उपविभाग व पोलीस ठाणेनिहाय संपर्क क्रमांक:
उपविभाग परभणी शहर — 8956834911
पोलीस ठाणे नानलपेठ — 8956834912
पोलीस ठाणे नवा मोंढा — 8956834913
पोलीस ठाणे कोतवाली — 8956834914
उपविभाग परभणी ग्रामीण — 8956834915
पोलीस ठाणे परभणी ग्रामीण — 8956834916
पोलीस ठाणे दैठणा — 8956834917
पोलीस ठाणे ताडकळस — 8956834918
उपविभाग सेलू — 8956834919
पोलीस ठाणे सेलू — 8956834920
पोलीस ठाणे मानवत — 8956834921
पोलीस ठाणे पाथरी — 8956834922
उपविभाग जिंतूर — 8956834923
पोलीस ठाणे जिंतूर — 8956834924
पोलीस ठाणे बोरी — 8956834925
पोलीस ठाणे बामणी — 8956834926
पोलीस ठाणे चारठाणा — 8956834927
उपविभाग गंगाखेड — 8956834928
पोलीस ठाणे गंगाखेड — 8956834929
पोलीस ठाणे सोनपेठ — 8956834930
पोलीस ठाणे पिंपळदरी — 8956834931
उपविभाग पूर्णा — 8956834932
पोलीस ठाणे पूर्णा — 8956834933
पोलीस ठाणे पालम — 8956834934
पोलीस ठाणे चुडावा — 8956834935
जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती अथवा तक्रारींसाठी या अधिकृत संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 34