आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशनची वाटचाल निश्चितच गौरवास्पद


दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीकडे दमदार पाऊल; नवीन अभ्यासक्रमांची लवकरच घोषणा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Aug 2026, 12:53 PM
   

अकोला : 'आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन, अकोला' या शिवम बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित संस्थेचा नववा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. गेल्या नऊ वर्षांपासून शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य, अभिनय, भाषणकला, व्यक्तिमत्त्व विकास, सूत्रसंचालन, निवेदन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयोगशील आणि गुणवत्तापूर्ण कार्य करीत आहे. या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
      कार्यक्रमात उपस्थित मान्यवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एस.एस.सोसे, प्रा. डॉ.गजानन डोईफोडे, अशोक सरप आणि संस्थेच्या संस्थापक प्रा.डॉ.दीपाली सोसे  तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थापक तथा प्रमुख प्रा. डॉ. दीपाली आतिश सोसे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून गेल्या नऊ वर्षांच्या प्रवासात मोलाचे सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी, पालक,शिक्षक, हितचिंतक, प्रसार माध्यमे आणि समाजातील सर्व घटकांचे आभार मानले. आगामी काळात सर्व वयोगटांसाठी विविध नाविन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
      अध्यापन व प्रशासन प्रमुख प्रा. आतिश सुरेश सोसे यांनी संस्थेच्या यशामागे सर्वांचे सहकार्य हेच खरे बळ असल्याचे सांगून, "गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास" हेच संस्थेचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी उपस्थितांनी संस्थेच्या दहाव्या वर्षातील पदार्पणाबद्दल अभिनंदन करून, आनंदी गुरुकुलने भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत समाजासाठी प्रेरणादायी कार्य करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
            या कार्यक्रमांमध्ये आनंदी गुरुकुल चे भाषणकला अकॅडमीचे हरहुन्नरी विद्यार्थी प्रा.गजानन ठाकरे, आनंदी गुरुकुल अभिनय अकॅडमीचे विद्यार्थीनी शर्वरी मते, गुजरात येथील रिया जांगिड या तिघांनी गुरुवर्य दीपाली सोसे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. क्षितिजा राऊत हिने स्वागत गीत गायिले आणि रिया जांगिड, स्वराज सोसे,दिव्यानी मार्के, स्वरा चंदिवाले, अद्विक सोसे,विहान डाखोरे, वीर अवचार,अक्षरा वाघमारे,विधी वानखडे, आराध्या वसतकर, वेदिका सदांशिव, कबीर गोपनारायण, ध्रुव गोपनारायण,भाविका हिवराळे, गार्गी तायडे, जय तायडे, स्वरांश वाहुरकर, ईश्वरी चंदिवाले या विद्यार्थ्यांनी गुरूंना प्रणाम करून गुरुंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    Post Views:  25


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व