गोसावी समाज मंडळाची आमसभा २ ऑगस्ट रोजी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Jul 2026, 11:57 AM
   

अकोला गोसावी समाज मंडळ उमरी अकोलाची आमसभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी चार वाजता डि. ए. व्ही कॉन्व्हेंट स्कूल, आर्य  समाज मंदिर ओपन थिएटर समोर गांधी रोड अकोला येथे आयोजित करण्यात येत आहे. 
     या आमसभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून इतिवृत्त कायम करणे,  सन 2025 -26 च्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्यास आमसभेची मंजुरात घेणे, लेखापरीक्षण अहवाल मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर करणे, तसेच माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील. मंडळाच्या समस्त सभासदांनी आमसभेत वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पुरी यांनी पत्रका द्वारे केले आहे.

    Post Views:  8


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व