श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात उद्बोधन वर्ग कार्यक्रम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Jul 2026, 3:38 PM
अकोला - श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी (अकोला) येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला उद्बोधन वर्ग कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेशराव काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संकेत काळे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. बळीराम अवचार यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल डॉ. दिपाली देशमुख व डॉ.सुगत मोहोड यांनी केले.
यावेळी डॉ. दिपाली देशमुख यांनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. धर्मे मॅडम यांनी लिखित पुस्तकाचेही प्रकाशन करत आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे, ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याचे तसेच ज्ञानार्जनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले.
Post Views: 63