आत्ता दीप भव,स्वयंप्रकाशीत
क्रोधाला सत्य,संघाने जिंकूया
ज्ञान,तर्क,विवेक,विज्ञानाने
मानवता धर्म पाळूया....१
मनुष्य जन्म लाभला
जातपात नसावी उरी
एकता, बंधुता,सहिष्णुता
मानवाची हीच जात खरी....२
बुद्ध वाटेची गरज जगाला
शांती लाभेल मानवास
हिंसा,क्रोध, अहंकाराने
मानवी देहाचा होई ऱ्हास.....३
अशांत झाले मन
मानवास मानव कळेना
मुक्ती हिताचा मार्ग
बुध्दाशिवाय मिळेना....४
बुद्ध रुपी शांती
जागृत करूया देहाला
शांतिदुताच्या अष्टांगिक
सागरात न्हाऊया चला.....५
सृष्टीतील चराचरात
सामावला बोधरूपी बुद्ध
वाणीत,कर्मात, आचरणात
सत्यात करावे मन शुद्ध .....६
मानवा ओळख स्वतःला
देहात पंचशील अर्पण
बुद्धचरणी मोहमाया,द्वेष
हिंसा,देखाव्याचे कर समर्पण....७
अनिता देशमुख नांदुरा (बुलढाणा)
ह.मू. कल्याण
Post Views: 176