भाजप सेवानिवृत्त सेलच्या कार्यकारिणीत जानोरकर, प्रदीप खाडे, नेरकर, मांगुळकर यांची वर्णी


25 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या लावल्या मार्गी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Jul 2026, 12:51 PM
   

अकोला.... आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या भाजपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेलने आपल्या कार्यास धडाक्यात प्रारंभ केला आहे. आतापर्यंत या सेलने विविध विभागांमधील सुमारे 25 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
               या सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांची नियुक्तीपत्रे नुकतीच वितरित करण्यात आली आहेत. त्यात सुनील जानोरकर यांना संयोजक, प्रदीप खाडे यांना सहसंयोजक, राजेंद्र नेरकर यांना सरचिटणीस तर अशोक मांगुळकर यांना कोषाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारीण्या येत्या काही दिवसातच घोषित करण्यात येणार आहेत.
            या भाजपा सेल कडे सर्वच विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या दररोज येत आहेत. प्राप्त झालेल्या या सर्व समस्यांचा नीट अभ्यास करून तसेच शासकीय परिपत्रकांचे आकलन करून त्या सोडविण्याबाबत या सेल तर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. शासन स्तरावरील समस्या सोडविण्याबाबत आमदार रणधीर सावरकर यांचे अतिशय चांगले सहकार्य या सेलला मिळत आहे.एकंदरीत या सेलच्या निर्मितीमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा व विश्वसनीय आधार मिळाला आहे.  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या सेलचे स्वागत करून त्यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह आपल्या समस्यांबाबत या सेल शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व