महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने विठ्लराव माळी सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Jul 2026, 11:53 AM
   

अकोला : प्रगतशील शेतकरी, यशस्वी युवा उद्योजक तसेच शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा श्री. विठ्ठलराव पाटील माळी – बहादूरा, ता. बाळापूर, जि. अकोला यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाचा मानाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने  महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री वर्मा यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले  त्यावेळी विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार    आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र  देवुन सह पत्नी सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, आधुनिक शेती, नाविन्यपूर्ण प्रयोग, ग्रामीण विकास आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या एका प्रेरणादायी प्रवासाची दखल आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे विठ्ठलरावांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी शेती, पर्यावरण, ग्रामीण संस्कृती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम घडवून आणला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीतील नवकल्पना, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण भागातील युवकांना उद्योगशीलतेची प्रेरणा देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
आजच्या काळात अनेक अडचणी, नैसर्गिक संकटे आणि आर्थिक आव्हानांमध्येही चिकाटी, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतीत यश मिळवता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. त्यांचे कार्य असंख्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून ग्रामीण भागातील तरुणांना नवी दिशा दाखवली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण बाळापूर तालुक्याचा आणि विदर्भाचा गौरव वाढला आहे.
 शेतकरी वा डाच्या माध्यमातून   कृषी पर्यटनाला चालना देणारे विठ्ठलराव माळी हे बहादूरा चे माजी सरपंच असून त्यांना आजपावतो विविध संघटनेच्या वतीने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे..

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व