अग्रवाल हॉस्पिटल येथे 2 मे रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तर्फे ज्येष्ठ संपादक जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2026-04-29
खामगाव : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख, ज्येष्ठ संपादक, समाजसेवक श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 2 मे शनिवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ द्वारे करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडांच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा. या शिबिराचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता होणार आहे, तरी या कार्यक्रमास सर्व पत्रकार बंधू व मित्र परिवार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले व सर्व पदाधिकारी सदस्यगण यांनी तसेच खामगाव शहरातील सर्व पत्रकार बांधव यांनी केले आहे.
Post Views: 13