पाटील समाजाच्या योगायोग पुस्तिकेचे प्रकाशन विविध उपक्रम राबविण्यावर भर देणार


  विश्वप्रभात  06 Apr 2026, 11:51 AM
   

अकोला - पाटील समाज अकोला तर्फे तयार करण्यात आलेल्या योगायोग  या वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. स्थानिक हॉटेल हर्षवर्धन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर होते. समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांच्या संपादनाखाली तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत सर्वच संवर्गातील  उपवर मुला मुलींची कलर फोटोसह माहिती देण्यात आलेली आहे.
               याप्रसंगी अशोकराव अमानकर, प्रदीप खाडे, सुनील जानोरकर, राजेंद्र मोहोकार, विनायकराव शेळके, शरद वानखडे , पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली   बाहाकर, सचिव  ऍड. दिपाली जानोरकर, संघटिका सरिता वाकोडे, अर्चना पाटील, अशोक पटोकार, देवराव हागे पाटील, सुभाष म्हैसणे, रामेश्वर सपकाळ, सुरेश गाढे पाटील  डॉ. दिलीपराव मानकर, सुभाष पात्रीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
            आगामी काळात महिलांच्या समस्या सोडविण्याकरिता एक विशेष कक्ष स्थापन करणे, तालुकास्तरीय कार्यकारिण्या तयार करून प्रत्येक तालुक्यात मेळाव्यांचे आयोजन करणे, समाजास फसविणाऱ्या बुवाबाजी पासून वाचविण्यासाठी प्रबोधन करणे, सकल मराठा समाजाचे एकत्रीकरण करणे, विवाह समारंभातील फाजील खर्च, ध्वनी प्रदूषण टाळण्यासह विवाह वेळेवरच लावण्याचा प्रयत्न करणे आधी उपक्रमांवर भर देण्याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
            कार्यक्रमास   छावा  संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, अविनाश पाटील, संदीप महल्ले, पंकज जायले, रवींद्र  वैराळे, गजानन हरणे, देवानंद ताले, वासुदेवराव कडू, गजाननराव इंगळे, देवेंद्र ताले, विनायकराव गावंडे, शिवानंद माळी, सागर अमानकर, निवृत्ती पारस्कर, दीपक आखरे, वसंतराव घनोकार, निलेश पवित्रकार, विठ्ठलराव गाढे, रघुनाथ राव खडसे, निरंजन पावसाळे, नमित भुईभार, गुणवंतराव जानोरकर, श्रीकृष्ण माळी, ओम अमानकर, रामभाऊ पाटील, मधुकर महल्ले, सुधाकर वानखडे, श्याम कुलट, शैलेंद्र काळे, वर्षा पोरे, मीनल गोंडचवर, वनमाला ठाकरे, विद्या गावंडे, प्रतिभा पाथरीकर, स्वप्नाली कुलट, रोहिणी घनोकार, किरण काळे, प्रतिभा वैराळे, संजय चौधरी, प्रा. विनायक धोरण, हिम्मतराव पोहरे, संजय फोकमारे, मधुकर पाटील, संतोष ठाकरे, अशोक आखरे, वसंत रोकडे, बाळकृष्ण काळे, गजानन उपाध्ये, मंगेश पाथरीकर, उकर्डा भुईभार, प्रमोद केणे, धनंजय बोरोकार, रामेश्वर माळी, समाधान झाडोकार, गणेशराव टिकार, विवेक काटोले, राजेश शिंदे, राजेश गोठखडे,एस. बी. सरोदे, प्रा. शरद राव गावंडे, अरुण कुलट, पुरुषोत्तम सुर्वे यांचे सह इतरही समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे संचलन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी केले. योगायोग पुस्तिका अनंत मेडिकल स्टोअर्स रतनलाल प्लॉट अकोला व जानोरकर मंगल कार्यालय अकोलायेथे उपलब्ध आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व