देशातील सर्वभाषिक वृत्तपत्र संघटना ईलनाची सर्वसाधारण सभा संपन्न


आमदार संजय गायकवाडांच्या कृतीचा निषेध
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  27 Apr 2026, 6:43 PM
   

मुंबई -  देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या प्रकाशक,संपादकांची संघटना असलेल्या चलनाची सर्वसाधारण सभा मुंबईत नुकतीच संपन्न झाली. यावेळी वृत्तपत्रांच्या समस्या आणि शासनाच्या विसंगत धोरणाबाबत चर्चा होऊन संघटन शक्ती वाढवण्यावर एकमत झाले. या सभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत ओबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निषेध व्यक्त करीत प्रकाशाकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार इलनाच्या बैठकीत घेण्यात आला.
 भारतीय बहुभाषिक वृत्तपत्र समूहाच्या मुंबईत दादर येथील विदर्भ वैभव मंदिर सभागृहात पार पडलेल्या बैठकीत सर्व वृत्तपत्राच्या मालक प्रकाशकांनी गायकवाड प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारवरही निशाणा साधला. सत्तारूढ पक्षाचे लोक अशा आमदारांना पाठीशी घालत असतील तर उद्या वृत्तपत्रे आणि सरकारमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो याची जाणीव सरकारने ठेवली पाहिजे असे मत सर्वच मालक संपादकांनी व्यक्त केले.
 रविवारी दुपारी पार पडलेल्या ईलनाच्या विशेष बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली ईलना चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी सुनील डांग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पुढारी समूहाचे योगेश जाधव,ओरिसा समाचार चे सुधीर पांडा इलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मालक संपादक प्रकाश पोहरे श्री कृष्णा शेवडीकर, सार्वजनिक न्यास नोंदणीचे तज्ञ नितीन कुलकर्णी, इलनाचे पदाधिकारी पुरुषोत्तम गावंडे शरद वानखडे संजय देशमुख उपस्थित होते.
   या बैठकीला देशभरातील प्रमुख वृत्तपत्रातील मालक संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी इलना च्या वाटचालीची माहिती देताना राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी देशभरातील वर्तमान परिस्थितीवर सर्वांचे लक्ष वेधले. सामान्य माणसाच्या सोबत आपली नाळ कायम ठेवून सर्वांनाच अतिशय सहजपणे काम करावे लागत आहे, अशा परिस्थितीत सर्व वृत्तपत्राच्या मालकांची एकजूट असणे ही अत्यंत गरजेची आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
      सर्वोच्च न्यायालयात प्रकाश पोहरे यांची जनहित याचिका स्वीकारल्या बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.इलना मध्ये सर्वच मालक संपादक यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे व सदस्यता नोंदणी अभियानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सुद्धा प्रकाश पोहरे यांनी केले आहे.

    Post Views:  27


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व