राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट मुंबई येथे प्रदान
अकोला:- महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह मलबार हिल येथे. भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये अकोला जिल्ह्यात डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट यांनी अलौकिक असे गेल्या वीस वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्ती प्रबोधन व्यसनमुक्ती जागृती केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन आज त्यांना केंद्रीय समाज कल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले व महाराष्ट्र समाज कल्याण मंत्री मा. संजय शिरसाट समाज कल्याण आयुक्त मुंबई डॉक्टर हर्षवर्धन कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेले व्यसनमुक्ती पुरस्काराबद्दल अकोला जिल्ह्यामध्ये डॉक्टर मित्र व मित्रपरिवार व सामाजिक संघटनेमध्ये उत्साह वातावरण निर्माण झाले त्यांना मिळालेल्या राष्ट्रपिता व्यसनमुक्त पुरस्काराबद्दल जाहीर अभिनंदन अकोला जिल्ह्यामध्ये सर्वत्र होत आहे.
Post Views: 36