अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय,अकोला येथे निःशुल्क सेवाभावी उपक्रम दरवर्षी विश्वस्नेह फाउंडेशन संस्थे मार्फत राबविण्यात येते. कोणत्याही शासन-प्रशासन किंवा सामाजिक संस्थेकडून मदत नाही, महाराजांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा आश्रम चालतो. त्यामुळे कोणाला काही मदत करायची इच्छा असल्यास प्रशांत महाराज ठाकरे (मो. ९३७०४३२५६६) यांच्याशी संपर्क करावा.
गेली 3 वर्षापासून आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने वंचिताची दिवाळी उपक्रम असो की पर्यावरण संवर्धन काळजी बाबतचे उपक्रम असोत किंवा अनाथ, गोरगरीब मुलांचे शिक्षण असो इत्यादी उपक्रम ही संस्था चालवत आहे, या वर्षीही गोरगरीब मुलांच्या शिक्षणाकरिता साहित्य वाटप आपण करत आहोत
तरी ज्यांना ज्यांना मदतीचा हात आमच्या हातात द्यायची इच्छा आहे, त्यांनी या उपक्रमाला मदत करावी आपण वह्या, पेन्सिल, पेन, पाठी, रबर, चप्पल देऊन जीवनात आपला एक मदतीचा हात एखाद्या मुलाच भविष्य घडवू शकते. असे आवाहन प्रशांत महाराज ठाकरे यांनी केले आहे.