मनोज भिवगडे यांना स्व.अंबरीश कविश्वर युवा पत्रकार पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-04-13
   

अकोला- पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनिय योगदान देणाऱ्या   पत्रकारांना अॕड.स्व.धनश्री देव स्मृती प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी  स्व.अंबरीश कविश्वर युवा पत्रकार पुरस्कार दिला जातो.यासाठी दरवर्षी अकोल्यातील एका पत्रकारांची निवड केली जाते. यावर्षी हा पुरस्कार दै.लोकमतचे युवा पत्रकार श्री मनोज भिवगडे यांना प्रदान करण्यात आला.
     निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील  जेष्ठ पत्रकार महेंद्रजी कविश्र्वर, निलेश जोशी, मिलिंद गायकवाड या समिती सदस्यांच्या माध्यमातून यावेळी हा पुरस्कार  युवा पत्रकार श्री.मनोज भिवगडे,
यांना देण्यात आला आहे.३१०० रू. रोख आणि स्मृतचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील सहा वर्षांत निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने  प्रथम वर्षात मोहन शेळके,दुसरा शंतनुजी राऊत,तिसरा आशिषजी गावडे,चौथा करुणाताई भांडारकर,पाचवा संतोष ऐलकर तर  ६ व्या वर्षातील पुरस्कार नितीन गव्हाळे यांना देण्यात आला होता.त्यानंतर  वर्षीचा हाच ७ वा पुरस्कार श्री मनोज भिवगडे यांना देण्यात आला आहे. या प्राप्त सन्मानाबध्दल पत्रकार आणि स्नेही मित्रमंडळींच्या वतीने श्री मनोज भिवगडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

    Post Views:  293


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted