शासनाच्या जागेवर भींत बांधून ओपन स्पेस हडपणाराचे विरोधात


मनपा आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना शेकडो सह्याचे निवेदन; वृद्धांसाठी व मुलांसाठी मैदान खुले करावे
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Oct 2022, 11:26 AM
   

अकोला : महसूल कॉलनी, साईनाथ कॉलनी, संतनगर, श्रीकृपा सोसायटी, संतोष नगर, ़केशवनगर, गजानन नगरी ़खडकी बु. विभागातील नागरीक हे गेल्या ४० वर्षापासून या खडकी विभागात वास्तव्याला असून त्यांचा येण्या जाण्याच्या रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून रहदारीला अडथळा निर्माण केल्याबाबत व मंगरुळपीर रोडवर येण्यासाठी असलेला शासकीय ओपनस्पेसवर अवैधपणे भिंत बांधून त्यावर कब्जा करू पाहणारे टी.टी.एन. कॉलेजचे कार्यवेक्षक सचिन के. जोशी यांचेवर कार्यवाही करावी व त्यांचे ताब्यातून ओपन स्पेस खुला करावा या मागणीसाठी शेकडो लोकांच्या सह्याचे निवेदन आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांना दि. १२ ऑक्टोबर रोजी देण्यात आले. 
  एका ओपन स्पेसवर सचिन के. जोशी यांनी टी.टी.एन. कॉलेज बांधलेले आहे व दुसराही ओपन स्पेस बेकायदेशररित्या हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. शासकीय रहदारीच्या रस्त्यावर अडथळा करण्यासाठी सचिन काका जोशी (टी.टी.एन. कॉलेज कार्यवेक्षक) यांनी विटा व दगड आणून अवैधरित्या त्यांच्या मालकीची जागा नसतांना कायमरित्या शासकीय जागेवर (ओपन स्पेस)वर पक्के बांधकाम  करू पाहणारे व कायम स्वरुपी भिंत बांधून रस्ता कायम स्वरुपी बंद ़करण्याचा वाईट उद्देश असल्याने त्या शासनाच्या जागेवर अवैधरित्या बांधकाम व मटेरिअल टाकल्यामुळे व रस्ता बंद होत असल्यामुळे वरील वस्तीतील नागरिकांना कौलखेड-मंगरुळपीर रोडवर जाण्या येण्याकरीता गैरसोय होत आहे व सोबतच शासकीय भुखंड लाटण्याचा पुरेपुर प्रयत्न ़करत आहे. त्यामुळे सदर शासकीय भुखंड वाचविण्यासाठी आपण स्वत:हून दखल घेवून शासकीय रस्ता मोकळा करण्यात यावा व त्याच बरोबर विना परवानगी दगडी डब्बर व विटा रस्त्यावर ओपन स्पेसच्या जागेत टाकल्यामुळे त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही सचिन काका जोशी (टी.टी.एन. कॉलेज पर्यवेक्षक) चौकशी अंती कार्यवाही व्हावी व  सदर रस्ता हा वरील वस्तीतील लोकांना जाण्यायेण्यासाठी कायमस्वरुपी मोकळा करून देण्यात यावा जेणे करून आमच्या वस्तीतील नागरिकांची, विद्यार्थी, विद्यार्थीनींची गैरसोय होणार नाही व त्यांना शाळेला जाण्यासाठी योग्य रस्ता कौलखेड मंगरुळपीर असल्यामुळे त्यांची सुद्धा गैरसोय होणार नाही असेही निवेदनामध्ये नमूद केले आहे. 
शासकीय ओपन स्पेस असल्यामुळे त्यावर तेथील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना खेळण्यासाठी, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, व त्याच प्रमाणे पार्क व इतर नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध असतो यासाठी सदर भुखंड हा शासनामार्फत आपण ताब्यात घेवून त्या दृष्टीने सर्वतोपरी ओपन स्पेस डेव्हलप ़करून नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी त्याचा वापर व्हावा अशा हेतूने प्रयत्न व्हावेत व सदर ओपन स्पेस वरील व्यक्तींकडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न थांबवावा व त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही असे नमूद केले आहे. या निवेदनावर पंजाबराव वर, सौ. संजना नाना बोरकर, व रोशन मनोज गायकवाड, मदनकार साहेब, अनिल देशक्मुख, बोबडे साहेब, अश्वीनी मते यांच्यासह शेकडो लोकांच्या सह्या आहेत. 

    Post Views:  273


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व