साप्ताहिकासाठी जाहिराती बाबत शासनाची दुटप्पी भूमिका
व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.) चे जिल्हाधिका-यांना निवेदन
अकोला : माध्यमांना देण्यात येणा-या जाहिरातींबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेतली जात आहे. सरकार आणि माहिती व जनसंपर्वâ महासंचालनालय विभागाने साप्ताहिकांवर होणारा अन्याय थांबवावा. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे. साप्ताहिकांना डावलण्याबाबतचे निवेदन व्हाईस ऑफ मिडीय (सा.विं.) अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना दिले.
ाqनवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दैनिकांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात वितरित केल्या आहेत परंतु या जाहिराती वाटपात साप्ताहिकांना मात्र डावलण्यात आले. विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिराती वाटपाचे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवावे, जेणेकरून लघु वृत्तपत्रांवर अन्याय होणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विकासाला वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना व्यापक प्रमाणात पोहोचवता येतील. तसेच पुढच्या सर्व अभियान, उपक्रमाच्या जाहिरातीमध्ये आम्हाला डावलण्यात येऊ नाही. हा एकच विषय नाही यापूर्वीच्या अनेक विषयांमध्ये साप्ताहिकाला डावलण्याचं काम होते. साप्ताहिकांना न्याय देण्याची भूमिका घ्या.तसेच यादीवर नसलेल्या ाqनयमीत प्रकाशित होणाNया साप्ताहिकांना पुर्वी प्रमाणे जाहीरात मिळाव्यात या मागणी करीता ाqनवेदनावर संतोष धरमकर, पंजाबराव वर, डी. जे. वानखडे, प्रजानंद उपर्वट, संजय निकस (पाटील), संतोष मोरे, अजय विजय वानखडे, योगेश स. सिरसाट, तुषार हांडे, प्रशांत मानकर, पुâलचंद मौर्य, एजाज अहेमद, रमेश ह. समुद्रे, प्रशांत पळसपगार, सै. जमीर (जेके), पठाण इम्रान खान यांच्या सह्या आहेत.
Post Views: 132