लळा भक्तीचा लागला , विठ्ठला ठाई रे ||
सुख मिळाले जन्माचे विठ्ठला पायी रे ||धृ||
तुझे नाम ओठी, माय माऊलीचे
जन्म मरण चुकले , सांग ना कुणाचे
गोडी तुझ्या अभंगाची ,भासे जणू आई रे
सुख मिळाले जन्माचे विठ्ठला पायी रे||१||
तुझी आस अंतरंगी , सदा घडो सेवा
नाही मंदिरी पाऊले , मनी तुझा धावा
भक्तिभावे पूजिते मी , विठाई विठाई रे
सुख मिळाले जन्माचे विठ्ठला पायी रे||२||
ओढ तुझ्या दर्शनाची ,लोचनास आशा
संसारात गुंतली ही ,चिंता निराशा
दर्शना त्या होई ,जीवाची लाही लाही रे
सुख मिळाले जन्माचे विठ्ठला पायी रे*||३||
मोहमाया संसारात , काळवेळ नाही
ज्योत मनी पेटविते , वाट दाव काही
नेत्री रूप तुझे ,आले पायी पायी रे
सुख मिळाले जन्माचे विठ्ठला पायी रे||४||
अनिता देशमुख नांदुरा (बुलढाणा)
ह.मू. कल्याण
Post Views: 363