वारीमुळे धर्माची धारणा होते : ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Jun 2023, 8:38 AM
   

दौंड वरवंड : कोणताही यज्ञ, वेदपठण ,महागडी अनुष्ठाने, कठोर व्रत, किंवा कोणताही हटयोग न करता ,वारकरी वारीमध्ये नराचा नारायण होतो. आहार शास्त्रानुसार वारीमध्ये लंघन घडून शरीरात शुद्धीकरण होते. वारीमुळे शारीरिक तप घडते. सन्मार्गाने वागावे ,सत्या चरणाचे अनुकरण करावे, परोपकार करावा ,मनावर नियंत्रण ठेवावे , नीतीअनितीचे परीक्षण होउन बुद्धी जागृत करून, धर्म धारण करून धर्माचरण करावे अशी शिकवणूक वारीमुळे मिळते. वारीमुळे धर्म जागृत होतो ,दया निर्माण होते व मनुष्याचा दातृत्व भाव निर्माण होतो. विवेक अविवेक ,नीती अनिती ,धर्म-अधर्म याचे परीक्षण वारीमध्ये होऊन वारीमुळे धर्माची धारणा होते ,असे मत जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार अपंग सेवक ह भ प डॉ. रवींद्र जी भोळे यांनी येथे व्यक्त केले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पंढरी आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक चौर्यांशी पंचक्रोशी सांप्रदायिक उरुळी कांचन दिंडीमध्ये वरवंड येथे डॉ. रवींद्र भोळे यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानी मी आविवेकाची काजळी/फेडूनी विवेक दीप उजळी/परी योगिया पाहे दिवाळी निरंतर, ह्या ज्ञानेस्वरीतील चवथ्या अध्यायातील ओविवर प्रवचन केले . यापुढे मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्रजी भोळे म्हणाले की, अनेक शारीरिक व्याधी ,शारीरिक तपामुळे नष्ट होतात त्याचप्रमाणे अनेक औषधे घ्यावी लागत नाही. रोग्याला योगी बनवण्याचे सामर्थ्य वारीमध्ये आहे, वारी म्हणजे कमी खर्चाचा एक यज्ञ आहे एक व्रत आहे . नास्तिकांनाही आस्तिक बनवण्याची क्षमता वारीमध्ये आहे, परमेश्वर रुपी एक अदृश्य शक्ती जगामध्ये आहे याची प्रत्यक्ष अनुभूती वारीमध्ये येते. तसेच माऊली ज्ञानेस्वर, संत तुकाराम महाराज हे योगी पावन मनाचे होतें, ते योगी पावन जगाचे झा ले.याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग सलग्नित दिल्ली ह्यांच्या वतीने वारकऱ्यांचे मोफत औषधोपचार व तपासणी करण्यात आली. डॉ. रवींद्र  भोळे हे गेली पस्तीस वर्षे पासून हा उपक्रम राबवत आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार ,अपंग सेवक ,वृक्षमित्र, व नैसर्गिक आपत्तीमध्ये कार्य केलेले , कोरोना पेंडेमिक मध्ये एक समर्पित भावनेने सेवाव्रती कार्यकर्ते आहेत.

    Post Views:  102


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व