. या अभियानामध्ये अकोला जिल्ह्याने भरीव कामगिरी करुन जिल्ह्याचा नाव लौकीक करावा, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, कर्मचारी- अधिकारी यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत बोलत होते.

आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षां मीना, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजीव फडके, जि.प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते.

खा.धोत्रे म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामविकासात लोकसहभाग निर्माण करण्यास नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे अभियान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध व्हावी या उद्देशाने अकोट पंचायत समिती अंतर्गत रोहनखेड ग्रामपंचायतने उपलब्ध केलेल्या क्यू आर कोडचे अनावरण करण्यात आले. आ. मिटकरी म्हणाले की, प्रत्येक गावाने पुढाकार घेत आधुनिक व पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यप्रणाली राबबाबी. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही. तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी गावापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्राम स्तरावर विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. ग्रामपंचायत कडून आकारल्या जाणारा कर वेळेवर म्हणजे दर महिना भरून नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे, यामध्ये सरपंचांनी पुढाकार घ्यावा तसेच कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी या अभियानासाठी सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वत:ला झोकून सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी अभियानाच्या शासन निर्णयावर आधारित सविस्तर सादरीकरण उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, दिगंबर लोखंडे व यशदाचे प्रशिक्षक एस.पी. पडघन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत दिगंबर लोखंडे यांनी केले. सुत्र संचालन विस्तार अधिकारी कृषी तथा यशदाचे प्रशिक्षक रोहिदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांनी केले.












