५० हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अटक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Jul 2025, 2:44 PM
   

अकोला : दहीहांडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी भगवान कांबळे यांनी एका तक्रारदाराकडून लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तक्रार अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) करण्यात आली होती.
तक्रारीच्या आधारे ACB च्या डीवायएसपी मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्या अंतर्गत कासली फाट्याजवळ पोलिस कर्मचारी भगवान कांबळे यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलिस खात्याच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास ACB करत आहे.

    Post Views:  77


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व