कलाकार नुरूद्दीन जावेद बहूजन विकास सांस्कृतिक कला मंचाच्या राज्य प्रसिध्दी पदावर
नांदेड- महाराष्ट्र राज्य बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिध्दी प्रमुख पदावर नुरूद्दीन जावेद सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सांस्कृतिक कला मंचाच्या मुंबई मुख्यालयाकडून ही परभणी येथे महाराष्ट्रातील कलाकारांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परभणीतील सावली विश्रामगृह येथे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुरूद्दीन जावेद सिद्दीकी (कलाकार नुरकस्कर)यांच्या कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याचे कौतुक करण्यात आले. २९ जून रोजी त्यांची महाराष्ट्र राज्याचे प्रसिध्दी प्रमुख म्हणून राज्य बहुजन विकास कला मंचाकडून नियुक्ती करण्यांत आली.संस्था अध्यक्ष दत्ता शिंदे,उपाध्यक्ष तात्याराव झंडे,जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले. संस्थेचे उपक्रम,कलाकार कल्याण आणि संघटन कार्यासाठी समर्पित भावनांनी प्रामाणिकपणे काम करत राहण्याचे अभिवचन नुरूद्दीन जावेद सिद्दीकी यांनी यावेळी दिले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल मुंबई,इंदूर मध्यप्रदेश,दिल्ली आणि बंगळूरू येथील कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 55