*विशाल बोरे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित*


राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्यावतीने नागपुरात सन्मान*
 विश्व प्रभात  17 Dec 2024, 1:08 PM
   

अकोला : येथिल दूरदर्शन वृत्तप्रतिनिधी तथा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे वृत्तप्रतिनिधी विशाल प्रभाकर बोरे यांना राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने नागपूर येथिल प्रेस क्लब येथे पार पडलेल्या पत्रकार संमेलनात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
यावेळी राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल,केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
2014 पासन पत्रकारितेत असलेल्या विशाल बोरे यांनी पत्रकारीता क्षेत्रात वेगळी एक ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना आजवर विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कारासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
या पूर्वीही बोरे यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार,युथ आयकॉन पुरस्कार,कविवर्य जगदीश खेबुडकर युवासाहीत्य राज्य पुरस्कार, संताजी साहित्य, कला राज्य पुरस्कार,शब्दशोध साहीत्य पुरस्कार,महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा राष्ट्रीय काव्यसाधना पुरस्कार, काव्यगौरव साहीत्य पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा छत्रपती संभाजीराजे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, दैनिक लोकशाही वार्ताचा अकोलारत्न, पुरस्कारासह विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व