श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 वार शुक्रवार रोजी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126 व्या जयंती उत्सवानिमित्त शाळेमध्ये भव्य प्रमाणात आंतरशालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर असणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री गजाननराव नारे साहेब संचालक प्रभात किड्स अकोला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मा.सौ. सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला तसेच प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला मा श्री शरदजी कोकाटे उद्योजक व पर्यावरण मित्र, मा श्री संजयजी आगाशे कलाशिक्षक, मा श्री आशिष चौथे सर कलाशिक्षक, मा श्री मंगेश श्रीवास सर कलाशिक्षक तसेच व्यासपीठावर सौ.डा. निर्मला भामोदे मॅडम उपमुख्याध्यापिका, मा श्री हिम्मतराव गवळी सर पर्यवेक्षक, मा श्री अमर देशमुख सर शिक्षक प्रतिनिधी मा श्री पराग ठाकरे शिक्षकेत्तर प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य रंगभरण स्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे ही भव्यरंगभरण स्पर्धा शाळेच्या मुख्य आवारामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा वेगवेगळ्या तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना रंगभरण करण्याकरिता दोन तासाचा वेळ दिला जाईल.
या स्पर्धेकरिता आतापर्यंत 1230 शाळेतील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे या कार्यक्रमाच्या नोंदणी करिता श्री सौजन्य कंकाळे सर व श्री रोशन वाकोडे सर यांच्याकडे देण्यात आलेली आहे.तसेच सौ शुभांगी गावंडे मॅडम स्पर्धा प्रमुख सौ नीलिमा ठाकरे मॅडम स्पर्धा प्रमुख आहेत तसेच सौ.वैष्णवी लांडे मॅडम स्पर्धा कार्यवाहक सौ..विद्या वसु मॅडम स्पर्धा कार्यवाहक आहेत आंतरशालेय रंगभरण स्पर्धेकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेच्या आयोजन शाळेचे क्रीडाशिक्षक श्री प्रशांत पावडे सर श्री मिलिंद लांडे सर करणार आहेत स्पर्धेकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता खाऊचे वाटप सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126 व्या जयंती उत्सव निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेने आयोजित केलेला आहे या स्पर्धेचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध रीतीने आयोजन आमच्या शाळेचे हरहुन्नरी नवउपक्रमधारक कलाशिक्षक श्री अमर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात पार पडत आहे तसेच ज्यांच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध उपक्रमांचे धनी शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर या स्पर्धेकरिता विशेष मार्गदर्शन व नियोजन शिक्षकांकडून करून घेत आहेत या स्पर्धेच्या यशस्वी ते करिता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत या आंतरशालेय रंगभरण स्पर्धेचे बहारदार सुंदर संचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ कविता शेळके मॅडम करणार आहेत तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. शुभांगी गावंडे मॅडम करणार आहेत.
Post Views: 6