चांगला समाजसेवक कसा असतो हे दाखवण्यासाठी मी उभा आहे - संजय शेळके


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Nov 2024, 2:39 PM
   

जिल्हा प्रतिनिधी वैभव हराळ
श्रीगोंदा - संजय शेळके यांना मनसे पक्षाचे तिकीट मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर लोकांना चांगला समाजसेवक कोण असू शकतो हे दाखवण्यासाठी लावतो आहे.आपण  दिलेले मत खूप महत्वाचे आहे.जेव्हा मतमोजणी सुरू होते त्या वेळी आपल्याला प्रत्येक मताचे महत्व लक्षात येत असते. त्यामुळे कोणा आमदार खासदार मंत्र्यांनी देखील याचे भान ठेवले पाहिजे. जनतेशी संवाद कशा पद्धतीने साधला पाहिजे, त्यांची आश्वासने कशी पूर्ण केली पाहिजे याचा विचार योग्य वेळी झालाच पाहिजे.असे विचार मनसेचे उमेदवार श्री.संजय शेळके  यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केले.
    मतदारसंघातील  नागरिकांना जी आश्वासन दिल्या गेलेली आहेत त्यांची पूर्तता निवडणूक पूर्ण होताच केली जातील. मनसे पक्ष दिलेल्या शब्दांना कधी विसरणार नाही. असे आश्वासन मनसे सहकार सेना उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी दिले. आज सत्य आणि खोटेपणाची  लढाई आहे. पाहू ही जनता सत्याच्या पाठीमागे किती प्रमाणात आहे. आपण  बाकी आमदारांना पण एक दोन संधी दिल्यात, पण त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. म्हणून आता एकदा मनसे दावेदार आमदार संजय शेळके यांच्यावर एकदा विश्वास ठेवून त्यांना विजयी करावे.असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    Post Views:  111


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख