ईश्वर तलवारे - (जिल्हा प्रतिनिधी)
देगलूर मध्ये पंकज निवृत्ती जाधव मातंग समाजाचा शिवनेरी नगर रामपूर रोड देगलूर येथील राहणारा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याने देगलूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.पंकज निवृत्ती जाधव हा सुमिल केमिकल्स इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड या कंपनीत नांदेड जिल्हा सेल्स म्हणून काम करत आहे.त्यांचा मित्र कृष्णकांत बिरादार राहणार चाकूर यांचे मोंढा मार्केट मध्ये तिरूमला कृषी सेवाकेंद्र आहे.पंकज जाधव काम करीत असलेल्या कंपनीचा माल त्यांना देत असल्याने तो त्यांचा ओळखेचा आहे.दि.17/9/2024/ रोजी कृष्णकांत बिरादार रा.चाकूर यांनी पंकज जाधव यांना दुकानावर बोलावून सांगितले कि संगम बोधने रा.तडखेल हा शिवालीप क्रॉप सायन्स कंपनी मध्ये काम करत असताना नांदेड व बिलोली येथील कृषी केंद्राना कृष्णकांत बिरादार यांना माल देऊ नका असे सांगत होता.त्यामुळे कृषी सेवा दूकानवाले माल देत नसल्यामुळे कृष्णकांत बिरादार यांना माल विकण्यासाठी तूटवडा पडत होता.त्यामुळे कृष्णकांत बिरादार यांनी पंकज जाधव यांना संगम बोधने ला समजून सांग असे सांगितले.कृष्णकांत बिरादार यांच्या सांगण्यावरून पंकज जाधव यांची संगम बोधने बरोबर अगोदर पासून ओळख असल्याने त्यास भेटून समजावून सांगावे म्हणून फोन केले व सांगितले तुला भेटून बोलायचं आहे सांगितले तर संगम बोधने यांनी रत्री समक्ष भेटल्यावर बोलू असे सांगितले.सकाळी 8:47 वाजता राजशेखर मंगल कार्यालय येथे भेटून.पंकज जाधव यांनी कृष्णकांत बिरादार यांना माल नको देऊ असे का सांगतो म्हणून संगम बोधने यांना विचारले. तर त्यांनी कृष्णकांत बिरादार यांच्यात मध्यस्थी करणारा तू कोण असे मध्यस्थी करायला खूप शहाणा झालास काय मांगडया. तुझ्या घरात घूसून मारतो तुझी औकात काय आहे. असे जातीवाचक शिवीगाळ करत धक्का बुक्की करत असताना गळ्यातील सोन्याची चैन तुटून पडली खाली बघत असताना पंकज जाधव यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली.या वरून पोलीस ठाणे देगलूर येथे तक्रार केली त्यानूसार कलम ११८,२९६,११५,३(१)(r) 3(1)(s),3(2)(va),गुन्हा दाखल झाला ॲड एन जी सुर्यवंशी साहेब लो प म मराठवाडा विभागीय अध्यक्ष,कॉम्रेड ईश्वर तलवारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष, कॉम्रेड गंगाधर भुयारे बळेगावकर, कॉम्रेड तुकाराम सुर्यवंशी वळगकर,ईनुस आतार, मारोती गवाले मरखेलकर, शंकर गायकवाड देघलूर,यांनी कारवाई करण्यास सहकार्य केले.
Post Views: 966