जलसंधारण विभाग व लोकप्रतिनिधींनी श्रीगोंदा येथील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवावा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Sep 2024, 1:27 PM
वैभव हराळ (जिल्हा प्रतिनिधी)
श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील शेतकरी लोकांना शेतीसाठी पाणी आवश्यक असून जलसंधारण विभागाकडून त्याचे वाटप होत असते.परंतू दुर्दैवाने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी लोकांना ज्या चारीने पाणी सुटते तीच गायब केलेली दिसून येत आहे. याने शेतीला पाणी तर नाहीच पण चारीला लागत असणारे रस्तेच पिकत आहेत. शेतकऱ्यांनी या चारीचे पैसे घेऊन चारी नाहीशी केली आहे. यामुळे काही शेतकरी लोकांना मात्र अडचण निर्माण अडचण निर्माण झालेली आहे. शेतीसाठी आणि पिकासाठी पाणी हे कमी पडत त्यामुळे हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान होते,आणि मोबदला मिळत नाही. चारी आणि त्याच्या लगतचा रस्ता मोकळा झाला पाहिजे. अशी मागणी वारंवार होऊन सुद्धा कोणतीच कारवाई केली गेली नाही.
कोणाकडे जायचे म्हणजे आम्हाला श्वास घेता येईल अशी आरोळी होत आहे. ना पाणी ना रस्ता मग पिक कसे घ्यायचे ही अडचण शेतकऱ्यांसाठी गंभीर ठरलेली आहे.लाईटवर विसंबून राहून उपयोग नाही.कारण उन्हाळी दिवसात तर भूगर्भात पाणीच नसते.या प्रश्नाकडे लक्ष देऊन जलसंधारण विभाग आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची ही गंभीर अडचण सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.
Post Views: 128