तहसीलदार वरणगावकर यांच्या आशीर्वादाने संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला उधान
अवैध रेती वाहतुकीची माहिती देणाऱ्यांनाच तहसीलदारांचे उलटे बोल
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
17 May 2023, 1:00 PM
(स्वप्निल देशमुख) संग्रामपुर :- तालुक्यातील रिंगणवाडी वान नदीपात्रामधून दररोज हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा सुरू आहे तहसीलदार वरणगावकर यांचे रेतीमाफीयासोबत असलेल्या आर्थिक देवाणघेवाणीतून संग्रामपूर तालुक्यातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा सुरू आहे. तहसीलदार यांना अवैध रेती वाहतुकीबाबत व अवैध रेती उत्खनन थांबविण्याबाबत जेव्हा नागरिक फोन करतात तेव्हा हे काम माझे नाही हे काम ग्राम दक्षता समितीचे काम आहे असे सांगून वेळ मारून नेतात. नागरिकांनी फोन करून जर सांगितले की या गावांमध्ये अवैध रेतीचा उपसा सुरू आहे तर तहसीलदार स्वतः आधी रेती माफीयांना मी तुमच्या गावांमध्ये रेतीच्या कारवाईसाठी येत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे वाहने बंद ठेवा असे सांगून त्या गावात जातात ते नदीपात्रात येत असल्याचे लोकेशन त्याच्या कर्मचारयामार्फत रेतीमाफीयांना देतात . रेती माफिया व तहसीलदार वरनगावकर यांच्यात पैशाची आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे जेव्हापासून तहसीलदार वरणगावकर रुजू झाले तेव्हापासून एकाही रेती माफियावर कारवाई करू शकले नाहीत . त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील नागरिक अवैध रेती वाहतुकी बाबतची माहिती आता तहसीलदार यांना न देता थेट अप्पर जिल्हाधिकारी यांना देतात त्यानंतर कुठे भ्रष्टाचारी तहसीलदार वरणगावकर यांचे शासकीय वाहून घेऊन नदीपात्रात न जाता वरवट बकाल शहरासारख्या चौकात जाऊन चहाच्या कॅन्टीन वर जाऊन बसतात व त्यांच्याच काही अंतरावरून रिंगणवाडी नदीपात्रातून वरवट बकाल शहरातील बाहेरून असलेल्या रस्त्यावरून अवैध रेतीचे वाहने सुसाट संग्रामपूर शहरात चालतात आणि तहसीलदार वरणगावकर हे त्यांना रेती माफियांकडून आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे वरवट बकाल चौकातील चहाच्या कॅन्टीनवर बसुन चहाच्या चुसक्या मारत बसतात. व अवैध रेती वाहतुकीला अश्या प्रकारे अभय देतात. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल या भ्रष्टाचारी तहसीलदार वरणगावकर यांच्यामुळे बुडत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी लक्ष देऊन संग्रामपूर तालुक्यात होत असलेले रेतीचे अवैध उत्खनन त्वरित थांबवावे अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील जोर धरत आहे.
जेव्हापासून संग्रामपूर तालुक्यात तहसीलदार वरणगावकर हे रुजू झाले तेव्हापासून संग्रामपूर तालुक्यातअवैध रेती वाहतुकीला उधाण आले आहे .अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांसोबत तहसीलदार वरणगावकर यांची आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीपात्रामधुन दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा सुरू आहे त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वान नदीपात्रात झालेल्या अवैध रेती उत्खननामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे मोजमाप घेऊन संबंधित तहसीलदार वा तलाठ्यावर कारवाई करावी
अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख संग्रामपूर
Post Views: 206