हास्यसम्राट किशोर बळी यांचा वसुंधरा कार्निवल मध्ये मिमिक्री शो संपन्न...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2022, 11:01 AM
   

मलकापूर - महादेव गौरक्षण संस्थान द्वारा संचालित श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेज,नांदुरा.
मध्ये  समर कॅम्प "वसुंधरा कार्निवल" चा तिसरा दिवस पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे  झी टी. व्ही. हास्यसम्राट फेम  किशोर बळी , गोपाल तुळशीराम मापारी, प्राचार्य श्री.विश्वास मापारी,संस्था संचालक श्री. रविंद्रसिंह ठाकुर ,  श्री. संतोष ठाकुर,श्री. उमेश सुरडकर  आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. वसुंधरा 2022 समर कॅम्पच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध खेळ  व स्पर्धा घेण्यात आल्या. आजच्या या समर कॅम्पचे मुख्य आकर्षण म्हणजे कॉमेडियन किशोर विजय बळी यांचा मिमिक्री शो हास्यबळी डॉट काँम.
कॉमेडियन किशोर विजय बळी यांची कॉमेडी अँक्ट पाहून सगळे हसून लोटपोट झाले. खूप उत्कृष्ट प्रकारे कॉमेडी करून त्यांनी ह्या समर कॅम्प "वसुंधरा कार्निवल" ची शोभा वाढवली. 
ह्य अगोदर  रोजी समर कॅम्प वसुंधरा कार्निवचे उ्घाटन करण्यात आले. ह्याप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय अनिल घनोकार सर,प्राचार्य श्री.विश्वास मापारी सर,संस्था संचालक रविंद्र सिंह ठाकुर सर, मा.संतोष ठाकुरसर , मा.उमेश सुरडकर सर आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. समर कॅम्पच्या पहिल्या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सुरवातीला पारखे सर यांनी विद्यार्थ्यांना योगा आणि कराटे याचे प्रशिक्षण दिले.विद्यार्थ्यांनी वीर महाराणा प्रताप वर ड्रामा आणि नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचा वार्षिक अहवाल श्री विलास धोरण सर यांनी सादर केला.        ह्यावेळी. सदर कँपमध्ये महाराणा प्रताप यांच्या वरील नाटीका , छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचा पोवाडा, मम्मी अँड मी, तसेच रंगोली आर्टिस्ट, क्ले आर्टिस्ट, व गिनिज बुक रेकॉर्ड होल्डर एस गोगा ह्यांचा  मँजिक शो , स्पोर्ट डे, रेन डान्स, दहीहांडी, आनंदमेला, संगीत रजनी, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनी, माईम अँड ड्रामा, , हाँरर शो, योगा व बालसंस्कार ई. भरगच्च कार्यक्रमानी परीपूर्ण आहे. 
ह्या संपूर्ण कार्यक्रमा करीता माननीय आमदार व संस्था अध्यक्ष राजेशभाऊ एकडे ह्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ह्या कार्यक्रमाकरीता संपूर्ण एस जेम्स व जेसी ची टिम कार्यरत आहे .  ह्यामध्ये श्री. धोरण सर, श्री प्रविन गिरी सर, श्री अमोल अवकाळे सर, श्री पंकज गायकवाड सर, श्री क्षीरसागर सर, सौ. कविता मानकर मॅडम, सौ. वनिता वडोदे मॅडम, निकिता मांडवे मॅडम, निकिता पांडव मॅडम, सौ.अर्चना साठे मॅडम, सौ. निकिता माहूरे मॅडम, धनश्री मलिक मॅडम, प्रगती डंबेलकर मॅडम, शितल हिवरखेडे मॅडम, सौ.पूजा गावंडे मॅडम,  सौ. अनिता इंगळे मॅडम,सौ.ममता बावस्कार मॅडम,सौ.दिशा डवंगे मॅडम, कल्पना खोद्रे मँडम व श्री. शैलेश ठाकूर सर,  तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी निलेश काजळे, रवि माहुरे , कल्पना राखोंडे, कविता ढवळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ममता बावस्कर मॅडम आणि  कु. कांचन बाठे मॅडम यांनी केले.

    Post Views:  289


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व