पत्रकार संजय देशमुख यांना स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Dec 2023, 12:39 PM
   

अकोला - अकोला येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष व ३५ वर्षांपासून सामाजिक,राजकीय,सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत  असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख,निंबेकर यांची स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ आर्गनायझेशन या संस्थेचा २०२४ चार स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 
       गेल्या १० वर्षात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत या संस्थेने अकोला - वाशिम जिल्ह्यात १०३ वाचनालयांची स्थापना करून गरजू- होतकरू विद्यार्थ्यांना लाखो पुस्तके वितरीत केली आहेत.समाजात युवकांमध्ये प्रबोधन आणि जागृतीचे कार्य करणाऱ्या या संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेश टाले आणि त्यांच्या निवड समितीने संजय देशमुख यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
        स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ ऑर्गनायझेशन ही स्वामी विवेकानंद यांच्या वैश्विक क्रांतीच्या परिवर्तनवादी सत्त्याच्या  दिशेने कार्य करणारी संस्था असून  मनोविकासातून  सामाजिक विकास साधून परिवर्तन घडवण्यासाठी वाचन चळवळ आणि सामाजिक प्रबोधन व  जागृतीच्या कार्यात सक्रिय असलेली संस्था आहे. समाजात वाचन चळवळ रूजविण्यासाठी अनेक गावांना पुस्तकांचे गाव निर्माण करण्याचा या संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेश टाले आणि सहकाऱ्यांचा  मनोदय आहे.या  अभियानात  प्रथम  त्यांच्या अकोला जिल्ह्यातील माझोड गावाला देशातील आणि महाराष्ट्रातील पुस्तकांचे दुसरे गांव निर्माण करण्याच्या कामात सध्या ते सक्रीय आहेत.
          अशा अभिनव ध्येयाच्या संकल्पनांना घेऊन चालणाऱ्या या संस्थेने संजय देशमुख यांच्या बाळापूर तालूक्यातील निंबा येथील सामाजिक कार्याचा शुभारंभ आणि तेथील उपसरपंच,त्यापूर्वी शिक्षणमहर्षी,पद्मश्री ,माजी राज्यपाल डॉ.डी‌.वाय.पाटील यांचे स्विय सचिव म्हणून पार पाडलेली प्रशासकीय आणि सामाजिक सेवेचा आढावा घेऊन हा निर्णय  घेतला आहे.सध्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजाभिमुख  राष्ट्रीय संघटनेच्या  माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे सुरू असलेले पत्रकार कल्याण कार्य आणि सामाजिक उपक्रमांचे मुल्यमापन करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 
         संजय देशमुख हे पत्रकार महासंघासोबतच सध्या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक,प्रकाशकांच्या इंडियन लॅग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या संघटनेचे राष्ट्रीय सचिव असून लोकनेते दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे हे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.देशमुख हे विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे संपादक,सहयोग प्रिन्टर्स चे संचालक असून, महाराष्ट्र मुद्रण परिषद,अकोला जिल्हा मुद्रक संघ,मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था,अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळ अशा विविध संस्था,संघटनांच्या माध्यमातून सध्या कार्यरत आहेत.

    Post Views:  241


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

रक्षाबंधन

४२ मिनेट