स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय अधिकाऱ्याला धारेवर धरले......
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Aug 2023, 3:13 PM
परभणी : राज्य शासनासह केंद्र शासन शेतकऱ्यांना पीक कर्ज मोठ्या प्रमाणात वाटप होत असल्याचा गाजावाजा करीत आहे. मात्र काही बँकांचे शाखा अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करून अपमानित करत आहेत. असेच काही प्रकरणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आले होते. त्यामधील शाखा पूर्णा, असोला व इतर काही शाखेचे मॅनेजर मगरूरपणे वागणूक देऊन शेतकऱ्यांना अपमानित करत असल्याचे वारंवार प्रकार घडत होते. त्यातील शाखा असोला येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ाखाधिकार्याने पीएम किसान निधीलाही होल्ड लावून शेतकरी पीएम किसान चा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले होते. तर शाखा पूर्णा येथील दत्तक गाव खांबेगाव येथील गावातील इतर शेतकऱ्याची पीक कर्ज थकबाकी आहे म्हणून नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी आज दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य विभागीय कार्यालय, परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन करत विभागीय शाखा व्यवस्थापकास धारेवर धरले. प्रसंगी बंदोबस्तासाठी विद्यापीठ गेट परिसरात असलेले पोलीस कर्मचारी संबंधित स्थळी जाऊन त्यांनी मध्यस्थी केली व संबंधित शाखांच्या व्यवस्थापकांना दमदाटी करण्यास भाग पाडले, अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा दम दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, दिगंबर पवार, मुकुंद वावरे, उद्धवराव जवंजाळ , माऊली शिंदे, शेख राशीद, पंडितआना भोसले, नारायण कदम, प्रसाद गरुड, निवृत्ती गरुड, सुधाकर खटिंग, रामभाऊ अवरगंड, मुंजाभाऊ लोडे, बाळासाहेब घाटोळ इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
Post Views: 143