वानखेड दुर्गादैत्य परिसरात अतिवृष्टी
शेतातून पाणी.....नागरीक बेघर बकऱ्या,गुरे गेली वाहून
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Jul 2023, 7:09 PM
संग्रामपूर ( स्वप्निल देशमुख) : तालुक्यातील वानखेड दुर्गादैत्य परिसरात शनिवारी रोजी सकाळी आलेल्या पावसामुळे गावातील घरांचा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेत जमीन अक्षरशः खरडून गेली. पिके जमीन दोस्त झाली आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, बकऱ्या ह्या पुरामध्ये वाहून गेल्या आहेत. परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाकडून आवश्यक मदती न पोहोचल्याने प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी गावाला भेटी देत आहेत.गावातील बेघर लोकांच्या घरांची तलाठी ,ग्रामसेवक सरपंच यांनी पाहणी सुरू केली आहे व. पंचनामा करण्यात आला आहे अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. शासनानच्या तात्काळ मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. तलाठी, ग्रामसेवक, यांनी वानखेड, दुर्गादैत्य गावातील ज्या पुराचे पाण्याने नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. परंतु अद्याप पर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही.शासनाने तात्काळ लक्ष देऊन लवकरात लवकर मदत देण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो सेशनला कंटाळले पूरग्रस्त
काही लोकप्रतिनिधी कोणत्याही मदतीचा दिलासा न देता फोटो सेशन करण्यात आणि सोशल मीडियावर चमकोगीरी करण्यात व्यस्त असताना दिसून आले. आपादग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या अश्रूंना कॅमेऱ्यात कैद करण्याची चढाओढ करताना प्रतिनिधी दिसून आले. याबद्दल पूरग्रस्तांमध्ये प्रचंड रोष आहे.
Connection failed: Operation not permitted