तारापूर भोपाळच्या धरतीवर दिवसेंदिवस अपघातात वाढ कामगार भयभीत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-07-22
(संतोष घरत) बोईसर :तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन झोन मधील एलेक्सो केमिकल(Alexo chemical) N - 174 कारखान्यात २० जुलै रोजी रात्री १ ते १:३० च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली . सदर घटनेची कारखानदारांनी स्पष्टोक्ती दिलेली नसून प्रकरण दणवण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास येत आहे. एलेक्सो केमिकल(Alexo chemical) हा कारखाना ज्या मालकाचा आहे. त्या मालकाच्या सुरक्षितते बाबतीत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. २८ फेब्र २०२३रोजी एका इमारतीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून काही कामगार जखमी झाले होते.अंक फार्मा M -2 ह्या कारखान्यामध्ये ब्लास्ट होऊन काही कामगारांचा मृत्यू होऊन अनेक कामगार जखमी झाले होते. अजूनही त्यातील काही कामगारांना न्याय सुद्धा मिळालेला नाही.ह्या सर्व घटना ह्या मालकाच्या बाबतीत घडलेल्या आहेत. ह्या मालकाने कामगाराच्या सुरक्षितते बाबतीत कळसच घाठला आहे.
औद्योगिक क्षेत्रामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्राचा आशिया खंडात प्रथम क्रमांक आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करणारे अनेक छोटे-मोठे शेकडो कारखाने आहेत. त्यामध्ये केमिकल, फार्मा, स्टील , कपडा बनविणे, व इतर माल बनवून तो इतर ठिकाणी आयात व निर्यात केला जातो. काही दिवसा पूर्वी डोंबिवली मध्ये एका कारखान्याला मोठी आग लागून स्पोट होऊन त्या स्फोटामध्ये १५० कामगारापेक्षा जास्त कामगारांचा नाहक जीव गेला होता. कामगाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगल्याने अशा घटना रोजच घडत असतात . म्हणजेच रोज मरे त्याला कोण रडे हे तितकेच खरे असून गेंड्याची कातडी परिधान केलेल्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? ठोस कारवाई केली तर अशा घटना घडण्यास प्रबंध बसू शकतो. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी हे थातून मातुर कारवाई करून अशी प्रकरणं दाबत असल्याचे कामगार व जनतेकडून बोलले जात आहे.
एलेक्सो केमिकल(Alexo chemical) N - 174 कारखाना हा केमिकल झोन युक्त कंपन्यांना लागूनच असल्याने
लागलेल्या आगीने जर रुद्र रूप धारण केल्या असते तर मोठी घटना घडून भोपाळ सारखी परिस्थिती उद्भवली असती ह्या मध्ये तीळ मात्र शंका नाही. सदर कारखान्याकडे फायर ब्रिगेडची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. सदर कारखानदार हा कामगारांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळत असल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सदर घटनेची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही? हे मात्र गुलदस्त्यातच.
Post Views: 175