माधुरी मोरखडे हिचे चार्टर्ड अकाउटन्ट परीक्षेत नेत्रदिपक यश
निंबा गावातील पहिली सिए होण्याचा बहूमान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Jul 2024, 10:53 AM
अकोला - सामाजिक क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्व निंबा येथील रहिवाशी व खामगांव अर्बन को.ऑप.बॅंकेचे व्यवस्थापक पुरूषोत्तम विठ्ठलराव मोरखडे यांची सुकन्या माधुरी हिने सनदी लेखापाल( सिए) च्या परीक्षेत विशेष मेहनतीने यशस्वी होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे.
सि .ए.चा अभ्यासक्रम कठीण म्हणून या क्षेत्रात करियर करण्याचा मानस फारच कमी विद्यार्थ्यांचा असतो.भरपूर अभ्यास आणि मेहनत म्हणून या विषयात यशस्वी होण्याची तयारी दाखवली जात नाही.परंतू माधुरीने या कठीण अभ्यासक्रमाची आव्हानात्मक दृष्टीकोनातून निवड केली. सातत्याने प्रयत्न आणि अभ्यासक्रमातील चिकाटीच्या सरावाला मेहनतीची जोड देऊन स्विकारलेले ध्येय पूर्णत्वास नेले.तिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल निंबा परिसर आणि खामगांवच्या बॅंकी़ग तथा सामाजिक क्षेत्रातून व आप्तस्वकीयांकडून एक गुणी मुलगी म्हणून तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून लोक स्वातंत्र्यपत्रकार महासंघाकडूनही संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख( निंबेकर) यांनी तिचे शुभेच्छांसह विशेष अभिनंदन केले आहे.
Post Views: 52