हिंद भारतीय कामगार सेना अखेर कामगारांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी- निलम संखे


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Jun 2023, 7:41 PM
   

बोईसर - (संतोष घरत) - तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने कारखाने असून, लाखोच्या संख्येने  कामगार काम करत आहेत. ह्या कामगारांवर अनेक प्रकारचे अन्याय झाले आहेत व सुरू ही आहेत. कामगारांना त् कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कामावरून काढणे , त्यांचा राहिलेला पगार न देणे, अपमानास्पद  वागणूक देणे , तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे व कायद्याचे पालन,  ही होताना दिसत नाही .अशा अनेक समस्या या सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्रास असून संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करत असल्याचे दिसत आहेत. ह्या मध्ये तीळ मात्र शंका नाही.

    तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हरेण टेक्स्टाईल जे-१४९ व अस्मि केमिकल के -४७ ह्या कारखान्यामध्ये कामगारावर झालेल्या अन्यायासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष निलम संखे हे आपल्या शिष्टमंडळासह हरेन टेक्सटाइल व अश्मी केमिकल ह्या कारखान्यात जाऊन कारखानदाराने कोणतीही पूर्व सूचना न देता, कामगाराला त्याचा हिशोब न देता कामावरून काढल्याबद्दल कारखाना मालक व व्यवस्थापनाला, धारेवर धरले असता कारखाना  व्यवस्थापनाने २ दिवसाचा वेळ मागून ,कामगाराला राहिलेला हिशोब देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे अन्याय झालेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते. त्यानी ह्या वेळेस निलम संखे व त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानले.
     कारखाना मालक व व्यवस्थापनाने जर दोन दिवसाच्या आत कामगारांना पेमेंट दिले नाही तर शिवसेना स्टाईलने ७ दिवसांमध्ये कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येईल व ह्या आंदोलनामुळे होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांना  कारखान्याचे मालक व व्यवस्थापन स्वतः जबाबदार राहील, असे हिंद भारतीय कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष निलम संखे याने विनंती वजा इशारा कारखान्याला  आज दिला आहे.

    Post Views:  198


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व