अवैध दारू आणि सट्टा व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ; पोलिसांचा वसुलीवर भर
(वैभव हराळ) श्रीगोंदा - -एकीकडे सरकार गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी अवैधछ धंद्याविरोधात राज्यात कठोर धोरण आखत असल्याचा दावा करीत असले तरी दुसरीकडे मात्र, घारगाव ता.श्रीगोंदा येथे दारू बंदी झालेली असुन सुद्धा पोलिसांच्या आशीर्वादाने या अवैध धंद्यांचे उदात्तीकरण होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. परिणामी, सरकारचे अहमदनगर पोलिसांवर नियंत्रण आहे की नाही, असा गंभीर प्रश्न अहमदनगर वासियांना पडला आहे. शहरात खुद्द पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू आणि सट्टा व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून या व्यवसायाच्या माध्यमातून बेलवंडी पोलिसांचे अर्थकारण चांगलेच फळाला येत आहे.
राज्यासह संपूर्ण देशात सध्या दारू विक्रीला घेऊन गरमागरम चर्चा सुरू आहे. महामार्गाशेजारी दारू विक्रीबंदी मुळे अनेक देशीविदेशी दारूची दुकाने आणि बार सध्या बंद आहेत. जिल्ह्यात केवळ मोजक्या प्रमाणात परवानाधारक दारू दुकाने व बार सुरू आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या वृत्त आहे . असे असताना मात्र, अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांचे पाठबळ असल्याने अनेक अवैध दारू व्यावसायिक जिल्ह्यात दारूची वाहतूक करून शहरी भागासह ग्रामीण भागातही सर्रास विक्री करीत असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत आहे. दारू व्यावसायिक आणि पोलिस यांच्यात अवैध दारू विक्री संबंधाने ताळमेळ असल्याने यातून पोलिस मोठ्या प्रमाणात मलई लाटत असल्याचे सांगण्यात येते. सदर अवैध वसुली कामासाठी काही खास पोलिसांची नेमणूक केल्याची जोरदार चर्चा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आहे.घारगाव ता श्रीगोंदा येथे अधिकृत दारुबंदी झालेली आसुन गावात राजरोसपणे अवैद दारुविक्री चालु आहे. खुले आम गावठी दारू, गुटखा विक्री तसेच गांज्या विक्री , गावामध्ये क्लब व मटका, जुगार आडडे बेलवंडी पोलीस स्टेशन च्या सहकार्याने जोरात सुरू आहे पोलीस निरीक्षक श्री संतोष भंडारे यांच्या कडे महिलांनी व गावकऱ्यांनी वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही उलट दारू विक्रेत्यांना हप्ते वसूल करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत गावातील दारू विक्रेत्यांनवर कारवाई करून दारू व इतर बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास याला जबाबदार पोलीस निरीक्षक व यंत्रणा असेल तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे यात जो प्रशासकीय व्यक्ती किंवा अधिकारी असेल त्यास पिणार्या नवर्यांच्या त्रासाला कंटाळलेली महिला संघटना रस्त्यावर उघडे केल्याशिवाय राहणार नाही सुचना नव्हे तर सुनामी अगोदरची सुप्त लाट समजा असा इशारा देण्यात आला आहे. तसेच लवकरच गृहमंत्र्यांना भेटून गावातील महिला व समाजसेवा ग्रुप तक्रारींचा पाढा वाचणार आहेत.
Post Views: 518