पुन्हा एक १९ वर्षीय युवतीचा विद्युत धक्क्याने मृत्यू


अश्या घटनानी सुन्न केले अकोलाकरांना
 विश्वप्रभात  05 Jul 2024, 7:36 PM
   

अकोला - शहरातल्या डाबकीरोड परिसरातल्या गजानन नगर मध्ये  आज सकाळी पिण्याच्या पाण्याचे नळ आले असता.19 वर्षीय संजना अंभोरे हिला पाणी भरत असताना पाण्याच्या पंपमध्ये असलेल्या विद्युत प्रवाहला धक्का लागल्याने  घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अकोलाकरांना अश्या घटनानी पुन्हा एकदा सुन्न केले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात कुलर चालू करताना किंवा बंद करताना किंवा कुलर चालू असताना कुलरमध्ये प्रवाहीत असलेल्या विद्युत ला धक्का लागताच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये चिमुकल्या मुलींचा, बालकांचा मृत्यू झाला आहे.  अश्या घटना वारंवार होत असल्यामुळे विज वितरण कंपनीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत काय करावे आणि काय नाही करावे याबाबत प्रसिद्धी पत्रकानंद्वारे  आवाहन केले आहे. मात्र अकोला मनपा विभागाच्या जल प्रदाय विभागा मार्फत महान येथील जलशयात अल्प जल साठा असल्यामुळे सप्ताहतून केवळ एक दिवस पाणी पुरवठा. केला जाईल असे आवाहन केल्यामुळे आपल्या घरी पाण्याची मोठी साठवण असावी यासाठी गृहिणीकडून पाणी खेचण्याच्या विद्युत पंपद्वारे  पाणी साठवण करण्याची घाई असते. याच घाईत विद्युत पंपमध्ये विद्युत पुरवठा प्रवाहीत आहे यांचे भान राहत नसल्याने त्या पंप ला धक्का लागतो. आणि अपघात होतो असाच  अपघात आज  डाबकीरोड परिसरातल्या गजानन नगर मध्ये  आज सकाळी पिण्याच्या पाण्याचे नळ आले असता.19 वर्षीय संजना अंभोरे हिला पाणी भरत असताना पाण्याच्या पंपमध्ये असलेल्या विद्युत प्रवाहला धक्का लागल्याने  घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने  शहरात शोक कळा पसरली आहे. असे अपघात  वारंवार होत असल्यामुळे मन सुन्न होत आहे.

    Post Views:  301


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व