जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 May 2024, 3:33 PM
   

अकोला : जिल्हाधिकारी निवासस्थानी महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज झाले. 
यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण त्यागणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रदिनानिमित्त विविध बालगृहांतील बालकांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले.
डॉ. जुईली अजित कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालसंरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक गजानन गवई, मोहन साठे, डॉ. विनय दांदळे, गायत्री बालिकाश्रम, शासकीय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, सूर्योदय बालगृह येथील बालके, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. 

    Post Views:  176


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व